HomeCrimeअखेर 'त्या' प्रकरणात नियुक्त झाले तपासी अधिकारी...ऍड नजीब शेख यांचे आंदोलन प्रारंभ...

अखेर ‘त्या’ प्रकरणात नियुक्त झाले तपासी अधिकारी…ऍड नजीब शेख यांचे आंदोलन प्रारंभ होण्यापूर्वीच दिले तपासी अधिकारी यांचे नियुक्ती पत्र…

अकोला – तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांनी पदाचा गैरवापर करून नामांकित वकील ऍड नजीब शेख ह्यांना गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपी बनवून त्यांच्या मोबाईल नंबर चा सी डी आर एस डी आर काढून ऍड नजीब शेख यांच्या वैयक्तिक गोपनीयताचे हणन केल्या प्रकरणी त्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला होता.

मात्र आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आंदोलन सुरू करण्यापूर्वी आंदोल क यांना बोलवून त्यांच्या समोर त्या प्रकरणात तपासी अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी यांना नियुक्ती दिली असून येत्या 7 दिवसात तपास पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असल्याने नियोजित ते आंदोलनतहकूब केले असल्याचे ऍड नजीब शेख यांनी सांगितले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments