Homeराज्यआकोटात धुमधडाक्याने साजरा झाला बैलपोळा...

आकोटात धुमधडाक्याने साजरा झाला बैलपोळा…

संजय आठवले आकोट

मागील दोन वर्षात कोरोना काळामुळे बंद झालेला बैलपोळा यंदा मात्र आकोट शहरामध्ये अतिशय धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यंदा पोळ्यामध्ये बैलांची संख्या अतिशय रोडावलेली दिसत असली तरी शेतकरी वर्गामध्ये मात्र प्रचंड उत्साहाची लाट दिसून येत होती. शेतीपयोगी विविध यंत्रे अवजारे निर्माण होत असल्याने शेती मशागती करता बैलजोडीची आवश्यकता कमी कमी होत असल्याचे दिसत आहे.

त्याच कारणाने बैल पाळणे शेतकऱ्यांसाठी कठीण होत चाललेले आहे. तथापि शेतातील अनेक कामे अशी आहेत की जी बैलजोडी विना केल्यास जाऊ शकत नाहीत त्यामुळे डोईजड होत असले तरी अनेक शेतकऱ्यांना बैल जोडी पाळावीच लागते अतिशय कठीण परिस्थितीतही बैलांचा सण मात्र ही शेतकरी मंडळी अतिशय आस्थेने आणि त्याच्या उपकाराप्रती उतराई होऊन साजरा करतात.

आकोट शहरात सोमवार वेस, आंबोडी वेस, खानापूर वेस, बुधवार वेस, एलीचपुर वेस, नंदी पेठ या ठिकाणी बैलपोळा भरतो. गत कोरोना काळात हा बैलपोळा भरलाच नाही परंतु यावर्षी कोरोनाची बंदी उठल्याने सारे सण अतिशय उत्साहाने साजरे केल्या जात आहेत. त्याच धर्तीवर आकोट शहरामध्येही बैलपोळा प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्साहात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments