Tuesday, April 16, 2024
HomeBreaking Newsअमरावती पदवीधर मतदार संघात लढतीची चुरस सुरूच...दुसऱ्या फेरीतील २८ पैकी ११ टेबलचा...

अमरावती पदवीधर मतदार संघात लढतीची चुरस सुरूच…दुसऱ्या फेरीतील २८ पैकी ११ टेबलचा निकाल…

Share

अमरावती पदवीधर मतदार संघात भाजपाचे डॉ. रणजीत पाटील आणि महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांच्या अत्यंत चुरशीची लढत सुरु असून पहिल्या फेरीतील २८ हजार मतांची मोजणी सुरु झाल्यानंतर महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडी यांना ११९९२ मिळाली आहेत, तर भाजपचे डॉ. रणजीत पाटील ११३१२ मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीत ६८० मतांनी माविआचे उमेदवार धीरज लिंगाडे आघाडीवर असल्याची माहिती मिळाली आहे.

तर आताच मिळालेल्या माहितीनुसार, दुसर्या फेरीतही भाजपचे उमेदवार रणजित पाटील पिछाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. दुसरी फेरीत एकूण 28 टेबलपैकी एकूण 11 टेबलवरील निकाल समोर आला आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे 4800 मते मिळाली असून भाजपचे डॉ. रणजीत पाटील यांना 4186 मते मिळाली असल्याने लिंगाडे 880 मतांनी आघाडीवर असल्याची प्राथमिक माहिती सूत्राने दिली आहे.

आताच आलेल्या माहितीनुसार, 56 हजार मतांच्या मोजणीनंतर

मविआचे धीरज लिंगाडे 1480 मतांनी आघाडीवर

धीरज लिंगाडे – 23795
डॉ. रणजीत पाटील – 22315


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: