Homeराज्यसांगलीतील मीरा हौसिंग सोसायटीत अस्वच्छतेचा कहर, महापालिका प्रशासनासह नगरसेवकांचाही कानाडोळा...

सांगलीतील मीरा हौसिंग सोसायटीत अस्वच्छतेचा कहर, महापालिका प्रशासनासह नगरसेवकांचाही कानाडोळा…

सांगली – ज्योती मोरे

मीरा हौसिंग सोसायटी प्रभाग क्रमांक 10 मध्ये सतत स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झालेला असतो. स्वच्छतेच्या बाबतीत मीरा हौसिंग सोसायटीआणि परिसरामध्ये महापालिकेच्यावतीने डोळेझाक केली जात आहे.

प्रचंड कचरा व दुर्गंधीचं साम्राज्य पसरलेलं आहे. बिल्डिंगला लागून असलेला परिसर कायम दुर्गंधीच्या अवस्थेत असतो, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून याठिकाणची स्वच्छता केली गेली नाही. कुठलेही मनपा आरोग्य विभागाचे कर्मचारी येऊन स्वच्छता करत नाहीत. कायम दुर्लक्ष करतात. सर्व काही परिस्थिती माहिती असून सुद्धा जाणून बुजून असं केले जाते. असा इथल्या रहिवाशांचा आरोप आहे.

प्रभागाचे सर्व अधिकारी स्वच्छता निरीक्षक मुकादम सर्वांना फोन तसेच व्हाट्सअप द्वारे संदेश पाठवून सुद्धा स्वच्छता करण्यासाठी विलंब केला जातो.शिवाय इथल्या स्थानिक नगरसेवकांचेही इकडे दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी ग्राउंड फ्लोअरला लागते , या सगळ्यामुळे अनेक आजार निर्माण होऊन,आरोग्य धोक्यात आले आहे.लवकरात लवकर महापौर तसेच महापालिकेचे आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाआहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments