गडमंदिरावर विविध समस्यांचा खच…
रामटेक – राजू कापसे
प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रामनगरी दुरवर प्रख्यात आहे. जेथे साक्षात भगवंताचेच चरण लागलेले आहेत अशा स्थळाची महती दुरवर काय असेल हे सहजच समजण्यासारखे आहे. यामुळेच की काय तर येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून भावीक भक्त तथा यात्रेकरू मोठ्या आस्थेने येत असतात. असे असले तरी मात्र प्रभु श्रीरामाचे देऊळ ज्या गडमंदीरावर आहे नेमके तेथेच विविध समस्या उद्भवल्याने त्याचा येणाऱ्या भाविक भक्तांसह यात्रेकरूंना प्रचंड त्रास होत असल्याचे चित्र गेल्या कित्येक वर्षापासुन येथे दिसुन येत आहे.
यात्रानिवासाअभावी यात्रेकरूंना गडमंदीराच्या पायऱ्यावर अंथरून टाकुन रात्र काढावी लागत आहे. तसेच अस्वच्छ सुलभ शौचालय, शुद्ध पाणि समस्या, पथदिवे आदी. समस्या येथे कायम आहेत. येथे चहुबाजुने राजकिय पदाधिकारी भरलेले असुन व विशेषतः स्थानिक नगर परीषदेला रामटेक तिर्थक्षेत्र विकास आराखडा व तसेच यात्राकर अनुदानातुन करोडोंचा विकास निधी मिळत असुनही मात्र नियोजनशुन्य कार्यप्रणालीमुळे रामटेकचे प्रख्यात गडमंदीर विकासापासुन कोसो दुर असल्याचे दिसुन येत आहे.
उल्लेखनीय म्हणजे जेथे संतांचा वास झाला अशा शेगाव तथा शिर्डी देवस्थानांचा विकासाच्या दृष्टीकोणातुन पार कायपालट झाला. मात्र ज्या स्थळी साक्षात भगवंत श्रीराम, सीता व भाऊ लक्ष्मण वनवासाच्या काळात आलेत व काही कालावधी वास्तव्य राहीले व याच कारणामुळे शहराला रामटेक नाव पडले अशा रामटेक येथील गडमंदीरावर विविध सोयी सुविधा तर नाहीच नाही पण समस्यांचा सडा पडलेला आहे.
रामटेक या नावाची महत्ता सुद्धा येथील ” स्वतःला स्थानिक भूमिपुत्र म्हणवुन घेणाऱ्या काही राजकिय नेत्यांना ” राखता आली नाही. अन्यथा त्यांनी जातीने लक्ष घातले असते तर आज काय होऊ शकले नसते असेही स्थानिक नागरीकांत बोलल्या जात आहे. येथील गडमंदिरावर बाहेरून येणाऱ्या यात्रेकरूकरिता यात्री निवास नाही, ठिकठिकाणी सुलभ शौचालय नाही, एखादी शौचालय असेल तर त्याची नियमीत साफसफाई नाही, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, पथदिव्यांची व्यवस्था नाही,
उपहारगृह व पूजेचे साहित्य विकणाऱ्या येथील स्थानिक नागरिकांना स्थायी स्वरूपात दुकान गाळे नाहीत, यात्रेकरूंना बसायला साधी खुर्ची सुद्धा नाही. नुकतेच गडमंदीर नगर (पुणे) येथुन काही यात्रेकरु दर्शनासाठी आलेले होते. मात्र येथे यात्रीनिवासाचीच सोय नसल्याने त्यांना गडमंदीराच्या पायऱ्यावरच अंथरून टाकुन कशीबशी रात्र काढावी लागली तेव्हा दुरवर प्रख्यात असलेल्या रामटेकच्या गडमंदीरावर यात्रेकरूंना अशा हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असेल तर याहुन मोठी शोकांतीका कोणती म्हणावी लागेल.

नागरीक ” त्या ” राजकिय नेत्यांच्या शोधात
रामटेक विधानसभा क्षेत्रात राजकिय खेळी खेळणारे राजकिय नेते चहुबाजुने भरलेले आहेत. उल्लेखनिय म्हणजे हे नेते विशेषतः निवडणुकीदरम्यान आश्वासणांच्या फैरी सोडतात. त्यात ” मी रामटेकचा शेगाव, शिर्डीच्या धर्तीवर विकास करेन ” असे नागरीकांना आवर्जुन आश्वासन देत असतात. मात्र निवडणुक काळ संपला की दिलेल्या या आश्वासनाला विसरून जाऊन तिलांजली देत असतात. तेव्हा गडमंदीरावरील बिकट परिस्थीती व विविध समस्या पहाता नागरीक आता ” त्या ” राजकीय नेत्यांना शोधात दिसुन येत आहे.
विकास निधीचे नियोजन योग्यरित्या होत नाही – नगरसेवक धोपटे
रामटेक नगर परिषदेला मिळत असलेल्या रामटेक तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे व रामटेक यात्राकर अनुदानाचे आवश्यक त्या ठिकाणी व योग्यरित्या नियोजन होत नाही. स्थानिक नेते आपल्या मर्जीने व सोयीने निधीचा गैरवापर करायला बाध्य करीत असतात. यामुळेच अजुनही प्रख्यात गडमंदीराचा परिपुर्णरित्या विकास घडुन आलेला नाही. गडमंदिरावर बाहेरून येणाऱ्या यात्रेकरूकरिता यात्री निवास नाही, ठिकठिकाणी सुलभ शौचालय नाही, एखादी शौचालय असेल तर त्याची नियमीत साफसफाई नाही,
शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, पथदिव्यांची व्यवस्था नाही, उपहारगृह व पूजेचे साहित्य विकणाऱ्या येथील स्थानिक नागरिकांना स्थायी स्वरूपात दुकान गाळे नाहीत, यात्रेकरूंना बसायला साधी खुर्ची सुद्धा नाही. उल्लेखनिय म्हणजे जेव्हा जेव्हा जिल्हाधिकारी तथा एस.डी.ओ. गडमंदीरावर भेट देण्यासाठी येणार असतात नेमके तेव्हाच येथे सर्वीकडे साफ सफाई आदी. कामे करण्यात येतात असे परखड मत यावेळी येथील नगरसेवक दामोधर धोपटे यांनी मांडलेले आहे.