Homeगुन्हेगारीशिवीगाळ केल्याच्या रागाने डोक्यात दगड घालून कासेगाव येथे झालेल्या खुनाचा पोलिसांनी लावला...

शिवीगाळ केल्याच्या रागाने डोक्यात दगड घालून कासेगाव येथे झालेल्या खुनाचा पोलिसांनी लावला छडा – आरोपीस अटक…

सांगली – ज्योती मोरे

गेल्या दोन महिन्यांपूर्वी 21 जुलै 2022 ला कासेगाव ते वाटेगाव रोडवरील राजारामबापू साखर कारखान्याच्या गेटवर मज्जिद युसुफ अत्तार वय वर्षे 60 यांचा डोक्यात सिमेंट काँक्रेटचा दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

याबाबत गेल्या दोन महिन्यांपासून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली आणि कासेगाव पोलीस ठाण्याच्या मार्फत तपास सुरू होता. मात्र याबाबत कोणताही सुगावा लागला नव्हता. एका खास बातमीदार मार्फत सदरचा खून हा हनमंत राजाराम पाटील वय वर्षे 44 राहणार शेणे, तालुका वाळवा यांनी केल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यास चौकशीसाठी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपणास मयत मज्जिद अत्तार यांने दारू पिऊन शिवीगाळ केल्याचा राग अनावर झाल्यानेच सिमेंट काँक्रेटचा दगड डोक्यात घालून त्याचा खून केल्याचे कबूल केले आहे. त्यानुसार त्यास कासेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आज त्यास न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती, जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, तासगाव विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, कासेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे,

पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर, सुनील चौधरी, जितेंद्र जाधव, संदीप गुरव, अनिल कोळेकर, चेतन महाजन, सागर टिंगरे, संदीप नलवडे, नागेश खरात, कुबेर खोत, ऋषिकेश सदामते, संकेत कानडे, विनायक सुतार, प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे याचबरोबर कासेगाव पोलीस ठाण्यातील महेश गायकवाड, राहुल पाटील, दीपक घस्ते, अमित वंजारी आदींनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments