Homeराज्यमूर्तिजापूर शहरातील मुख्य रस्त्याचाही विक्रमच...

मूर्तिजापूर शहरातील मुख्य रस्त्याचाही विक्रमच…

न्यूज डेस्क – कालच राष्ट्रीय महामार्गावर लोणी ते माना या दरम्यान डांबरीकरणाचा विश्व विक्रम स्थापित केला ज्याची गिनीज ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. समस्त मूर्तिजापूर तालुका वासियांसाठी अभिमानाची हि बाब आहे. तेवढीच मूर्तिजापूर शहरातील मुख्य रस्ताच्या कांक्रीटीकरणाला येत्या जुलै महिन्यात तब्बल पाच वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यामुळे हाही एक मोठा विक्रमाच म्हणावं लागेल…पाच वर्षात शहरातील 1.9 km चा मुख्य रस्ता पुर्ण होता होईना. हे सर्व श्रेय आपल्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या मेहनितीचे आणि धन्य आहे तो कंत्राटदार…

शहरात वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून शहरातील मुख्य रस्ता रुंद व्हावा अशी अनेक नगरसेवकांची इच्छा होती, त्यासाठी शहरातील भली मोठी झाडांची कत्तली सुद्धा करण्यात आल्यात, हिरवेगार दिसणार शहर एकदम भकास दिसायला लागल, मात्र काही नगरसेवक म्हणायची आता बघा विकास कसा होतो, रस्त्याच्या मधोमध झाडे असतील, रस्ता ९० फुट लांब असेल अशी बरीच स्वप्ने दाखविण्यात आली, मग त्यासाठी निधीही आणला मात्र येथील नगर सेवक मजा मारतील आणि आपल्याला काहीच मिळणार नाही या हेतून या रस्त्याचे काम सार्वजनिक बाधकाम विभागाला दिले. या रस्त्याची सुरुवातच खराब झाली दोष नसताना एका चिमुकल्या विद्यार्थ्यांला आपला हात कायमस्वरूपी गमावून बसावे लागले. जुलै २०१७ पासून सुरु झालेल्या याकामासाठी सुरुवातीला २३ कोटी ३७ लाख रुपये एवढा निधी आणला त्यातही रस्ता पूर्ण न झाल्याने आणखी यामध्ये वाढ झाली असावी.

नगरपालिकेत सत्ता कोणाचीही असू द्या, एकमेकांना शिव्या देणारे सर्व एकत्रच बसतात त्यामुळे एकाला दोष देणे योग्य नाही. मात्र कमीशन खोरीच्या नादात या मुख्य रस्त्याची वाट लावल्याची चर्चा जनसामान्यांत आहे. याचा मुख्य सूत्रधार म्हणजे कोण आहे हे सांगायची गरज नाही. तुमच्या गावाची ओळख हे गावातील रस्ते स्वच्छता यावरून होते तर ह्या दोन्ही बाबतीत शहर हे मागासलेलं दिसते. दर्यापूर या शहरातील रस्ते बघून तेथील जनता किती जागरूक आहे, त्याच प्रमाणे प्रतिनिधी सुद्धा चांगले असावेत असा अंदाज बांधल्या जातो, मात्र या शहराचं दुर्दैवच म्हणाव लागेल. गाव भकास करून एका अडाणचोट लोकप्रतिनिधी स्वतःची संपत्ती १०००% टक्के वाढविली, प्रत्येक व्यवसायात त्याची भागीदारी आहे. हे सर्व लोकांना माहिती आहे मात्र बोलायची हिम्मत कोणाची होत नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments