आकोट – संजय आठवले
संपूर्ण आकोट शहराची ऊत्सुकता ताणणारे आकोट पालीकेचे प्रभागनिहाय आरक्षण अखेर ओबिसी आरक्षणाविनाच घोषित करण्यात आले. एकुण ३५ जागांसाठी काढण्यात आलेल्या या आरक्षणात १५ जागा सर्वसाधारण महिलांकरिता, २जागा अनुसुचित जाती महिलांकरिता, २ जागा अनुसुचित जातीकरिता तर १ जागा अनुसुचित जमाती महिलाकरिता आरक्षित करण्यात आल्या. ऊर्वरित १५जागा सर्वसाधारण म्हणून घोषित करण्यात आल्या.
आज दि.१३ जून रोजी आकोट पालीकेचे बहूप्रतिक्षीत व बहूचर्चित आरक्षण काढण्यात आले. आकोट शहराची मतदार संख्या ९२६३७ असुन त्यात अनुसुचित जातीचे १०४६१ व अनुसुचित जमातीचे १३२४ मतदार समाविष्ट आहेत. ह्या मतदारांसाठी एकुण १७ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. त्यात प्रभाग क्रमांक १ ते १६ मधून प्रत्येकी २ जण तर प्रभाग क्रमांक ७ मधून ३ जण असे एकूण ३५ नगरसेवक प्रतिनिधित्व करणार आहेत.
या आरक्षणामध्ये प्रभाग क्रमांक ४ अ व १५ अ ह्या दोन जागा अनुसूचित जाती (SC) महिलाकरिता, प्रभाग क्रमांक ९ ब व १६ ब ह्या दोन जागा अनुसुचित जाती (SC) करिता तर प्रभाग क्रमांक ६ अ ही एक जागा आनुसुचित जमाती (ST) महिलाकरिता आरक्षित करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक १,२,३,५,८,९,१०,११,१२,१३,१४,१६ व १७ मधिल “अ” जागा तर प्रभाग क्रमांक ७ मधिल “अ व ब” ह्या दोन जागा अशा एकुण १५ जागी सर्वसाधारण महिलाना आरक्षण देण्यात आले आहे.
ऊर्वरित १५ जागा सर्वसाधारण राहणार आहेत. शहारातील लोकसंख्येच्या आधारावर अनुसुचित जमातीकरिता एकच जागा आरक्षित करण्यात आली. कोणत्याही आरक्षणात एकच जागा आरक्षित होत असल्यास ती ती महिलेसाठी असेल या नियमानुसार ही जागा महिला आरक्षित करण्यात आली आहे.
ह्या महिला आरक्षणाने आकोट पालीकेत पूरुषांपेक्षा महिलांची संख्या एकने वाढली आहे. त्यामूळे आकोट पालीकेतील एकूण ३५ नगरसेवकांमध्ये १८ महिला व १७ पूरुष राहणार आहेत. परंतु महिलांसाठी आरक्षित नसलेल्या जागेवरुनही महिला निवडून आल्यास पालीकेत महिलांच्या संख्येत अजुन भर पडणार आहे.
प्रभाग आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाची जबाबदारी रो.ह.यो. ऊपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, आकोट पालीका मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर, कार्यालय अधिक्षक सागर पहूरकर, संगणक अभियंता करण चिपळे, संजय बेलूरकर, ऋषी तायडे यानी यशस्वी पार पाडली.