किचनमध्ये गुंडाळी मारून बसलेल्या कोब्रा सापाला सर्पमित्राने असे केले रेस्क्यू…अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ…

0
160

रामटेक – राजू कापसे

अंगाला काटे आणणारा रेस्क्यू रामटेक सुभाष वार्ड येथे दिनेश काळेकर यांच्या राहते घरी पहाटे 6 वाजता चक्क किचन मध्ये गुंडाळी मारून बसलेला जहाल विषारी नागाला पकडून सर्पमित्र सागर धावडे यांनी घरच्या लोकांना केलं भयमुक्त. खूप मोठी जीव हानी तडली आज दिनांक. 4/9/2022 रोजी पहाटे 6 वाजता चा सुमारात दिनेश काळेकर यांचा घरचे सदस्य गाड झोपेत होते.

त्यांना अचानक किचनमधले भांडे पडल्याचे आवाज आले. व त्याची झोप उघडली त्यांनी किचन मध्ये धाव घेतली त्यांना गॅसच्या खाली भांड्या मध्ये गुंडाळी मारून फणा काडून ब आप दिसून आला त्यांनी जोरात ओरडा ओरड केली व घरचे सदस्यांची झोप उघडली त्यांनी लगेच वेळ न गमावता वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन सर्पमित्र प्राणी मित्र राहुल कोठेकर व अजय मेहरकुडे यांना कॉल करून किचन मध्ये साप असल्याची माहिती दिली त्यांनी लगेच सर्पमित्र सागर धावडे यांना कॉल करून माहिती दिली.

सागर धावडे वेळ न गमावता पहाटे 6 वाजता रामटेक सुभाष वार्ड येथे पोहोचले व किचन मध्ये जातात ब्राऊन कोब्रा जहाल विषयाची नाग दिसून आला सागर धावडे यांनी आपला स्टिक च्या मदतीने त्या सापाला बाहेर काढले व त्या सापाला प्लास्टिकच्या बरणीत पकडून सुरक्षितपणे बंद केले सर्पमित्र सागर धावडे यांच्या घराच्या सदस्यांनी धन्यवाद केलं की तुम्ही ऐका फोन वर इतक्या लवकर येऊन साप पकडले. वेळ कोणती पण असो तुमच्या सेवेकरिता वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन रामटेक संस्था सदैव तत्पर राहील.