HomeSocial Trendingचक्क चोरच म्हणतोय मला सोडू नका !...धावत्या ट्रेनला लटकला चोर...पहा Viral Video

चक्क चोरच म्हणतोय मला सोडू नका !…धावत्या ट्रेनला लटकला चोर…पहा Viral Video

Viral Video – आजकाल रेल्वे प्लॅटफॉर्मवर आपल्याला मोबाईल चोरीच्या अनेक घटना बघायला मिळतात, ट्रेन सुरु झाल्यावर चोर संधीचा फायदा घेत खिडकीजवळ असलेल्या प्रवाश्याचा मोबाईल हिसकून घेतात. तर अनेक चोर मोबाईल चोरण्यात यशवी होतात तर अनेकदा चोराची फजिती होते. असाच एका चोराच्या फजितीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ बिहारमधील बेगूसराय इथला असल्याचं बोललं जात आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती चालत्या ट्रेनच्या खिडकीबाहेर लटकलेल्या अवस्थेत दिसत आहे. तो आतमध्ये बसलेल्या व्यक्तींना हात न सोडण्याची विनंती करत आहे. सदर व्यक्ती मला सोडू नका, नाही तर मरेल असं स्थानिक भाषेत सांगताना दिसत आहे.

स्टेशनवरून ट्रेन सुरु झाल्यानंतर चोराने मोबाईल हात मारण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एका प्रवाशाने त्याचा हात खिडकीतच पकडला. ट्रेनने वेग पकडत प्लॅटफॉर्म सोडला होता. त्यामुळे जीवाच्या भीतीने तो लोकांना हात न सोडण्याची विनंती करत होता. लोकांनी त्याला खिडकीबाहेर पकडून पुढच्या स्टेशनवर नेले. चोरट्याचा हा प्रवास सुमारे 10 किलोमीटर चालला. शेवटी गाडी खगरियाजवळ आल्यावर लोकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं.

खाली हा व्हायरल video पाहा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments