Homeराज्यसेंट पॉल्स अकॅडमीच्या १०० % निकालाची परंपरा कायम...

सेंट पॉल्स अकॅडमीच्या १०० % निकालाची परंपरा कायम…

संजय आठवले – आकोट

नुकत्याच हाती आलेल्या वर्ग १० वीच्या निकालामध्ये स्थानिक सेंट पॉल्स अकॅडमी , अकोट ची १०० % निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी १० वी च्या परिक्षेस बसलेल्या १३३ विद्यार्थ्यांपैकी १० विद्यार्थ्यानी ९ ५ % च्या वर झेप घेवून शाळेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा खोवला.

यामध्ये प्रेक्षा प्रकाश ठोकळ आणि तनुश्री प्रवीण खवले ९६.४० % , अभय राजेश भुसकट ९६.२० %, महेश प्रभुदास नाथे ९६.०० % , ओम गजानन साबळे , चेतन रमनलाल अग्रवाल , चिन्मय सचिन इंगळे , अंशुल नितेश अग्रवाल ९५.८० % , वेदांत संजय बेलुरकर , विशाखा नरेश पुरोहीत ९५.४० % गुण प्राप्त केले . एकुण ८७ विद्यार्थ्यांनी ९० % च्या वर तर ४४ विद्यार्थ्यांनी ७५ % च्या वर प्राविण्य प्राप्त केले.

विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटीया, उपाध्यक्ष लुणकरण डागा, सचिव प्रमोद चांडक, कोषाध्यक्षा सौ. रेखा चांडक, सदस्या सौ. शारदा लखोटीया, सौ . सुधा डागा, प्राचार्य विजय बिहाडे, उपमुख्यध्यापिका सौ. ममता श्रावगी, पर्यवेक्षक योगेश्वर कुलट, जयश्री हिंगणकर,

यामीनी पाटील, मिलिंद लबडे, वनिता थोरात, अभिजीत मेंढे, नितिन गावंडे , अनिता सोनोने, प्रशांत ठोकळ, प्रभुदास नाथे, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना देतात. गुणवंत विद्यार्थ्याचे सर्व संचालक मंडळ, प्राचार्य यांनी कौतुक केले व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments