Thursday, March 28, 2024
Homeविविध'या' महिलेने दिला जुळ्या मुलांना जन्म…पण दोघांचे वडील वेगळे…वैद्यकीय शास्त्रातील दुर्मिळ घटना…जाणून...

‘या’ महिलेने दिला जुळ्या मुलांना जन्म…पण दोघांचे वडील वेगळे…वैद्यकीय शास्त्रातील दुर्मिळ घटना…जाणून घ्या…

Share

वैद्यकीय शास्त्रातील अतिशय दुर्मिळ मानली जाणारी घटना पोर्तुगालमध्ये घडली असून येथे राहणाऱ्या एका १९ वर्षीय महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही मुलांचे वडील वेगळे आहेत. या प्रकाराला हेटेरोपॅरेंटल सुपरफेकंडेशन Heteroparental Superfecundation असे म्हटले जाते.

19 वर्षीय मातेने या जुळ्या मुलांना जन्मानंतर सुमारे आठ महिन्यांनी वडिलांनी मुलांची डीएनए चाचणी केली. अहवाल आल्यावर ती व्यक्ती एकुलत्या एक मुलाचा बाप असल्याचे समोर आल्याने त्या पित्याला धक्काच बसला. दुसऱ्या मुलाचा बाप दुसरा कोणीतरी आहे. मात्र, दोन्ही मुले दिसायला सारखीच आहेत. तज्ज्ञांनी सांगितले की, विज्ञानाच्या भाषेत याला हेटेरोपॅरेंटल सुपरफेकंडेशनची स्थिती म्हणतात. संपूर्ण जगात हेटेरोपॅरेंटल सुपरफेकंडेशनचे हे केवळ 20 वी ज्ञात प्रकरण आहे.

Heteroparental Superfecundation म्हणजे काय
तज्ञ म्हणतात की हे हेटरोपॅरेंटल सुपरफेकंडेशनचे प्रकरण आहे, ही एक दुर्मिळ स्थिती आहे. यामध्ये जन्मलेल्या दोन्ही जुळ्या मुलांमध्ये वेगवेगळ्या वडिलांचा डीएनए आढळून आला आहे. असामान्य गर्भधारणेच्या पॅटर्नचा अभ्यास करणारे डॉ. टुलिओ जॉर्ज फ्रँको म्हणाले की, आईच्या शरीरात असलेली अंडी दोन वेगवेगळ्या पुरुषांद्वारे फलित झाल्यावर अशी परिस्थिती निर्माण होते.

सदर महिलेने दोन वेगवेगळ्या पुरुषांशी संबंध असल्याचेही कबूल केले आहे. म्हणजेच ती दोन वेगवेगळ्या पुरुषांसोबत रिलेशनशिपमध्ये होती. म्हणून त्या मुलांमधील डीएनए वेगळे होण्याचे हेच कारण आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: