Homeसामाजिकनगरधन येथे समाधान शिबिराचा हजारो नागरीकांनी घेतला लाभ...

नगरधन येथे समाधान शिबिराचा हजारो नागरीकांनी घेतला लाभ…

रामटेक – राजू कापसे

आज दि. ३० सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शाळा नगरधन येथे प्रशासन आपल्या गावी या उपक्रमांतर्गत समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान येथे विविध विभागाचे अधिकारी – कर्मचारी नागरीकांच्या सेवेसाठी उपस्थित होते.

यावेळी शिबीराचे अध्यक्ष म्हणुन आशिष जैस्वाल आमदार रामटेक तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन सौ.कलाताई ठाकरे ( सभापती पंचायत समिती रामटेक ), सतीश डोंगरे ( जिल्हा परिषद सदस्य ) संजय झाडे ( जिल्हा परिषद सदस्य ) ,एस.डी.ओ वंदना सवरंगपते , बाळासाहेब मस्के ( तहसीलदार ) , सौ.अश्विताताई बिरणवार ( पंचायत समिती सदस्य ) , प्रशांत कामडी ( सरपंच ग्रा.प.नगरधन ) आदी. प्रामुख्याने उपस्थीत होते. दरम्यान शिबीरामध्ये लाभार्थ्यांना विभागनिहाय अर्ज देऊन लाभ देण्यात आला.

त्यामध्ये विद्युत विभाग दोन लाभार्थी, पुरवठा विभाग 230 लाभार्थी, आरोग्य विभाग 138 लाभार्थी, बीपी शुगर तपासणी 120 लाभार्थी, वन विभाग 504 लाभार्थी, भूमी अभिलेख तीन लाभार्थी, पंचायत समिती स्तरावरील 431 लाभार्थी, महसूल विभाग 23 लाभार्थी, निवडणूक 6 बी जोडणी 1234 लाभार्थी, आधार कार्ड निवडणूक कार्ड लिंक करण्याचे अर्ज स्वीकारणे 69 लाभार्थी तथा कृषी विभाग 28 लाभार्थी अशा एकूण 2794 लाभार्थ्यांनी यावेळी सदर समाधान शिबिरात लाभ घेतला.

यावेळी उपस्थितांमध्ये अनिल मुटकुरे ( उपसरपंच ग्रा.प नगरधन ) , अनिताताई वाघमारे ( ग्रा.प.सदस्य नगरधन ) , स्मिता काकडे मॅडम ( वैद्यकीय अधिकारी ) व सर्व अंगणवाडी सेविका , प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments