HomeMarathi News Todayबोरिवलीतील तीन मजली इमारत कोसळली...इमारत कोसळल्याचा Video व्हायरल...

बोरिवलीतील तीन मजली इमारत कोसळली…इमारत कोसळल्याचा Video व्हायरल…

किरण बाथम
पनवेल/रायगड

किरण बाथम
पनवेल/रायगड

बोरिवली – गीतांजली ही धोकादायक इमारत कोसळतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये सदर इमारत कोसळण्यापूर्वी संपूर्ण इमारत व इमारतीच्या खिडक्या, काचा हालत असल्याचे पाहताच इमारतीसमोरील रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली होती. तर रस्त्यावरून ये – जा करणारी वाहनेही थांबत थांबत त्या कोसळण्याच्या स्थितीत आलेल्या इमारतीकडे एक क्षण पाहत पुढे मार्गस्थ होत होती.

मात्र जेव्हा एका क्षणात इमारत डोळ्यांदेखत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली तेव्हा मात्र रस्त्यावर उभ्या महिला, मुले, नागरिकांनी घाबरून आरडाओरड करीत व स्वतःला वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. गीतांजली इमारत संपूर्णपणे कोसळताच इमारतीच्या ढिगाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ पसरली. सुदैवाने या इमारत दुर्घटनेत इमारतीचा ढिगारा थेट रस्त्यावर पडला नाही. अन्यथा रस्त्यावरून ये – जा करणाऱ्या वाहनांचे नुकसान झाले असते अथवा पादचारी जखमी झाले असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments