Friday, April 26, 2024
Homeराज्यव्हेल माशाच्या उलटीची तस्करी; दापोलीतील तिघांसह पाचजणांना पुण्यात केली अटक...

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; दापोलीतील तिघांसह पाचजणांना पुण्यात केली अटक…

Share

कोकण – किरण बाथम

पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 जण तब्बल 5 कोटीपेक्षा जास्त रकमेत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आ राजेंद्र राकेश कोरडे, वय २८, रा- मु.पो – अजंले ता- दापोली, जि-रत्नागिरी, २. नवाज अब्दुला कुरुपकर, वय २४, रा. मु.पो अडखळ, अंजर्ले, जुईकर मोहल्ला ता- दापोली,

जि. रत्नागिरी ३. अजिम महमुद काजी, वय ५० वर्षे, रा.मु.पो – अडखळ, अंजर्ले, जुईकर मोहल्ला ता- दापोली, जि. रत्नागिरी यांनी घेऊन येऊन इसम नामे ४. विजय विठ्ठल ठाणगे, वय-५६, धंदा – व्यवसाय, रा- चैतन्यनगर, रामचंद्र अपार्टमेंट, फ्लॅट नं २०३, धनकवडी, पुणे ५. अक्षय विजय ठाणगे, वय- २६ रा अस अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

आरोपी राजेंद्र राकेश कोरडे यांच्या ताब्यात असेलेल्या काळया रंगाच्या बॅगेमध्ये व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा त्याचे वजन २ किलो ९९४ ग्रॅम इतके कि २,९९,४०,०००/- इतकी आहे. तर दुसरा आरोपी नवाज अब्दुला कुरुपकर याच्या ताब्यात असलेल्या मेहंदी रंगाच्या बॅगेमध्ये आढळलेल्या व्हेल माशाच्या उलटीच्या तुकड्याचे वजन २ किलो २८६ ग्रॅम इतके आणि त्याची किंमत २,२८,६०,००० एवढी आहे.

तसेच तिसरा आरोपी विजय विठ्ठल ठाणगे याच्या कडील ताब्यात असलेली एक काळया रंगाची हिरोहोंडा स्पेल्डर एन एक्स जी स्मार्ट दुचाकी क्रमांक एम.एच १२ एम. के – ९१९३ अशा वर्णनाची किंमत ३५,००० असा एकूण 5 किलो व्हेल माशाचा उल्टीचे तुकडे आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्याच्याकडून ५.२८,३५,००० एवढ्या किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: