दि. ९ जून २०२२ गुरुवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला जिल्ह्याच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी साहेब यांना एकाच ठिकाणी १५ वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला च्या वैद्यकीय अधिकारी डॉ.आरती कुलवाल यांची बदली करण्यात यावी व आरोग्य विभाग उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण हे खाजगी वैद्यकीय व्यवसाय करतात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी वर्ग-१ व वर्ग-२ अधिकारी यांची तीन वर्षात बदली करण्याचे नियम आहे.
परंतु सर्व नियमांना पायदळी तुडवत वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती कुलवाल या गेल्या कित्येक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळत आहे. खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे प्रमाण जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथे होत आहे आणि त्यांना पाठबळ देणारे त्याचप्रमाणे खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणारे आरोग्य विभाग अकोला चे उपसंचालक डॉ.राजकुमार चव्हाण या डॉक्टर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांची त्वरित बदली करण्यात यावी,ही मागणी साठी निवेदन देण्यात आले.

यावेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे विदर्भ अध्यक्ष तथा अकोला जिल्हाध्यक्ष रोहित रवींद्र वानखडे, महानगर उपाध्यक्ष राजकुमार शिरसाट, रिपब्लिकन युथ मोव्हमेंट चे विदर्भध्यक्ष मिलिंद शिरसागर, शिवदास वानखडे यावेळी उपस्थित होते.