Homeशिक्षणआदिवासी माना जमातीच्या मुलीचे घवघवीत यश...वैष्णवी डडमल हिने संपादन केले 93.40% गुण

आदिवासी माना जमातीच्या मुलीचे घवघवीत यश…वैष्णवी डडमल हिने संपादन केले 93.40% गुण

देवलापार प्रतिनिधी,
आदिवासी बहुल भागातील बोरडा (सराखा),येथील आदिवासी माना जमातीच्या मुलीने 10 वी च्या परिक्षेत 93.40 टक्के गुण घेवुन घवघवीत यश संपादन केले. कु.वैष्णवी मनोहर डडमल असे तिचे नाव असुन ती बोरडा येथील रहिवासी आहे. ती श्रीराम कन्या विद्यालय रामटेकची विद्यार्थिनी आहे.

वैष्णवी हे एका गरीब शेतकऱ्याची मुलगी.वडील शेती सांभाळून आई आशा वर्कर असून आपल्या मुलीच्या शिक्षणात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.वैष्णवी ही अभ्यासात हुशार होती.म्हणून तिला अभ्यासाव्यतिरिक्त इतर कामे फार कमी देण्यात येत होते.अशातच तिचे घवघवीत यश संपादन केल्याने आई वडिलांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आल्याचे चित्र दिसून आले.

11 वी ला विज्ञान शाखेत ऍडमिशन घेऊन नंतर NEET परीक्षा देऊन डॉक्टर बनण्याची ईच्छा असल्याचे तीने सांगितले. साधने वेळेवर उपलब्ध नसतांना देखील ती दररोज वाटेल त्या साधनाने 18 किलोमिटर ये जा करीत तिने संघर्षातून 93.40 टक्के गुण मिळविले.तिच्या यशाचे श्रेय ती तिच्या शिक्षकांसह आई वडिलांना देते. संघर्षातून मिळालेल्या यशाची मजा काही वेगळीचे असते असे वैष्णवीने पत्रकारांशी बोलतांना सांगीतले.

बोरडा या आदिवासी बहुल गावातून वैष्णवीने भरभरून गुण प्राप्त केल्याने गावात एकच चर्चा सुरू झाली आहे.बोरडा येथून प्रथमच इतके गुण प्राप्त करणारी वैष्णवी ही प्रथम मुलगी ठरली.वैष्णवी ही गावातील आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना ग्राम शाखा बोरडा ची पदाधिकारी असून तिने घेतलेल्या या यशाबद्दल संघटनेच्या वतीने तिचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments