Homeराज्यस्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...

स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…

कोल्हापूर – राजेंद्र ढाले

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे यांच्या २६ व्या स्मृतीदिना निमित्त माँसाहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना शाखा क्र.३ बाल हनुमान तरुण मंडळाच्या कार्यालयामध्ये माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी “अमर रहे अमर रहे माँसाहेब अमर रहे” या घोषवाक्यांनी शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, विक्रम चौगुले, संतोष चौगुले, दिपक रेडेकर,शरद माळी,बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार,अजित चव्हाण, आबा जाधव, दत्तात्रय विभुते, महेश पवार, पिंटू खोडकर,बाबासो मगदूम, शिवपुत्र स्वामी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments