Homeराज्यपहेलवानाच्या खुनात दोघांना अटक, दारूच्या लोभाने केली मित्राची मदत...

पहेलवानाच्या खुनात दोघांना अटक, दारूच्या लोभाने केली मित्राची मदत…

नरखेड – अतुल दंढारे

पहेलवानाच्या खुनातील आरोपी हा मिल्ट्रीचा सैनिक आहे. सुटीवर आला की तो मिल्ट्री मधील दारू आणून पाजतो. दारूच्या लोभापायी स्वतःच्या भविष्याचा कुटुंबाचा विचार न करता मित्राने केलेल्या अमानुष खुनात मोवाड येथील दोन तरुणांनी बेलोना येथील केशव मस्के याचा पिस्तूल नि गोळी झाडून खून करणाऱ्या आरोपी भारत कळंबे याची मदत केल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. त्या दोघांनाही आज नरखेड पोलिसांनी अटक केल्याने खुनातील आरोपींची संख्या तीन झाली आहे.

निलेश जाधव वय २९ व जगदीश कठाणे वय २७ दोघेही रा. मोवाड अशी आज अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सोमवार दि १२ला सायंकाळी ५.३० वाजता भारत कळंबे , निलेश जाधव व जगदिश कठाणे या तिघांनी निलेश जाधव च्या मोवाड येथील हेअर कटिंग सलून मध्ये बसून ६.३० पर्यंत दारू ढोसली. नंतर जगदिश कठाणेच्या मोटारसायकल वर जगदीश व भारत बेलोण्याला आले.

मृत केशव पहेलवान हा दररोज सायंकाळी ६.४५ ते ७ च्या दरम्यान शेतातून दूध घेऊन येतो याची माहिती आरोपीला होती. मृताचा शेतातून परत येण्याचा रस्ता हा आरोपीच्या घरासमोरून आहे. मृताचा मागोवा घेऊन तो बस स्टँड पासून काही अंतरावर येताच आरोपीने अंधाराचा फायदा घेऊन मागच्या बाजुने मेंदूत सहा राउंड च्या माऊझर ने एक गोळी झाडली. अंधाराचा फायदा घेऊन आरोपीने मोवाडच्या दिशेने पलायन केले.

जगदीश व भारत मोवाड कडे जाताना रस्त्याच्या बाजूला बेलोना शिवारात आरोपीने एका शेतात माऊझर फेकल्याची कबुली दिल्याचे कळते . मुख्य आरोपी भारत याने मोवाड येथे जाऊन निलेश जाधव कडे अंगावरील कपडे व पायातील बूट बदलवून त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी निलेश जाधव याच्यावर दिली.

त्याने आरोपीचे कपडे व बूट जीवना नदीच्या पाण्यात टाकल्याचे चौकशीत आढळून आल्याने त्या दोघांना सहआरोपी करून आज अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध भा द वी३०२, ३४ आर्म ऍक्ट २५ , ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथम श्रेणी दंडाधिकारी न्यायालयात त्यांना आज दाखल केले असता न्यायालयाने त्यांना १७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिला आहे. अशी माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे यांनी दिली.

पोलिसपुढील आव्हान

जीवना नदीला पाणी असल्यामुळे आरोपीचे कपडे व बूट शोधून मिळविणे पोलिसांपुढे आव्हान आहे. तसेच खुनात वापर झालेल्या सहा राउंड माऊझर हस्तगत करणे हेही एक आव्हान पोलिसांसमोर आहे. आरोपीने खुनात वापरलेले माऊझर कुठून मिळविले. याचाही शोध पोलीस घेत आहेत. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आरोपी सैनिक भारत कंळबे ने घटनेच्या सहा दिवसागोदर मध्यप्रदेशातील पांढुरणा येथून माऊझर आणल्याचे समजते.

दारूच्या लोभाने आयुष्य उद्धवस्त

मील्ट्रीची दारू पिण्याबाबत युवकांमध्ये क्रेझ आहे. त्या क्रेझ मुळे ट्रॅक्टर ड्राइवर असलेला जगदीश कठाणे व हेअर सलून चालक निलेश जाधव व सैनिक भारत कळंबे यांची मैत्री झाली. भारत सुटीवर आला की या तिघांनी मैफिल रंगत असे. याच दारू पिण्याच्या मैत्रीतून निलेश व जगदीश यांनी भारतची गुन्ह्यात मदत केली . निलेश जाधव याचे एसटी महामंडळात निवड झाली होती. परंतु दारू च्या आकर्षणामुळे त्याचे आयुष्य उध्वस्त झाले.

पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार

मृतक केशव बाबुराव मस्के याचे पार्थिव फॉरेन्सिक पोस्टमार्टेम करिता नागपूरला पाठविण्यात आले होते. काही तांत्रिक अडचणी मुळे काल पोस्टमार्टेम होऊ न शकल्याने आज सकाळी पोस्टमार्टेम झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास बेलोना स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात शांतता पूर्ण तणाव असल्यामुळे अंत्यसंस्कार समयी अनुचित घटना घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव यांच्या देखरेखीत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त बेलोना येथे तैनात करण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments