HomeSocial Trending'त्या' चिमुकलीसाठी दोघे ठरले देवदूत…पाचव्या मजल्यावरून पडणाऱ्या मुलीचा अलगदपणे घेतला झेल…व्हायरल व्हिडीओ…

‘त्या’ चिमुकलीसाठी दोघे ठरले देवदूत…पाचव्या मजल्यावरून पडणाऱ्या मुलीचा अलगदपणे घेतला झेल…व्हायरल व्हिडीओ…

न्यूज डेस्क – सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोन व्यक्तीने यामध्ये एक महिला आणि एक पुरुष असल्याचे दिसत आहे या दोघांनी आपल्या शौर्याने सर्वांची मने जिंकली…यातील एका व्यक्तीने पाचव्या मजल्यावरून पडलेल्या मुलीला पकडले. मुलगी अचानक इमारतीच्या खिडकीतून पडल्याने हा प्रकार घडला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे.

वास्तविक, ही घटना चीनच्या झेजियांग प्रांतातील टोंगजियांगची आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनीही हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आणि लिहिलं की, हीरो आपल्यामध्ये आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला फोनवर बोलत असल्याचे दिसत आहे. त्याला मुलगी वरून पडताना दिसली. तो लगेच इमारतीच्या दिशेने धावू लागतो. तो फोन जमिनीवर फेकतो.

यानंतर, पडण्यापूर्वी, तो वरून पडणाऱ्या मुलीला पकडण्यासाठी हात वर करतो. मुलगी सरळ त्याच्या हातावर पडते. मात्र, या पुरुषासोबत एक महिलाही मुलाला पकडण्यासाठी मदत करताना दिसत आहे. मुलीला वाचवताना शेनचा मोबाईलही तुटला. दोघांनी मुलीला पूर्णपणे सुखरूप पकडले ही नशीबाची गोष्ट होती, मुलगी खाली पडू शकली नाही, अन्यथा कोणताही अनुचित प्रकार घडू शकला असता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलीला वाचवणाऱ्या व्यक्तीचे नाव 31 वर्षीय शेन डोंग असे आहे. शेनने सांगितले की तो फोनवर बोलत असताना त्याला मोठा आवाज आला. त्याने मागे वळून पाहिले तर एक लहान मुलगी स्टीलच्या छतावर पडताना दिसली. त्यानंतर ती पहिल्या मजल्यावरच्या काठावर पडली. ती रस्त्यावर पडण्यापूर्वीच त्यांनी मुलीला हवेत पकडले.

दुसरीकडे या घटनेनंतर मुलगी तेथून कशी पडली याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या व्हायरल व्हिडिओ येथे पहा..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments