रामटेक – राजू कापसे
रामटेक तालुक्यातील सराखा (बोरडा) येथे शेतात बांधून असलेल्या दोन म्हशीचा वीज कोसळून मृत्यू झाला.ही घटना काल दि.१८ जुन ला दुपारी १.००च्या सुमारास घडली. त्यात मालकाचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
परिसरात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने हजेरी लावायला सुरवात केली आहे. काल दुपारी १.००च्या सुमारास पावसापूर्वी विजा कडाडत होत्या. त्याच काळात सराखा येथील हरिदास तोंडंरे यांनी नेहमीं प्रमाणे आपले जनावर झाडाखाली बांधले होते. दुपारी२.००च्या सुमारास जनावरे चरायला सोडायला गेले असता १२जनावरापैकी एका झाडाखाली बांधलेल्या २ म्हशीं चा विजे मूळे घटनास्थळी मृत्यू झाला असल्याचे दिसले.