HomeMarathi News Todayदोन दिवसांचा विसावा...रविवारपासून 'या' जिल्ह्यात परत धुंवाधार पाऊस...नागरिकांना अलर्ट...

दोन दिवसांचा विसावा…रविवारपासून ‘या’ जिल्ह्यात परत धुंवाधार पाऊस…नागरिकांना अलर्ट…

अमोल साबळे – नागपूर पाऊस अपडेट गेल्या पाच दिवसांपासून विदर्भात संततधार सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने नद्या, नाले तुडूंब वाहू लागले आहेत. पुराचा फटका शेतीला तर बसलेला आहेच, मात्र सर्वसामान्यांचेही जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपूर जिल्ह्यातही ७४ टक्के अतिरिक्त पर्जन्यमान झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी पुराचा फटका बसला आहे.

नागपुरात सध्या दोन दिवस पावसाची विश्रांती
रविवारपासून पुन्हा तुफान पावसाला सुरुवात
विदर्भाला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट

नागपूर एरवी पर्जन्यमानाची सरासरी गाठण्यासाठी चातकासारखे डोळे लावून बसणाऱ्या विदर्भात यंदा ४३ टक्के अतिरिक्त पाऊस झाला आहे. सध्या हा पाऊस थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसून येत नाहीत. पुढील दोन दिवस विदर्भाला पावसापासून काहीसा दिलासा मिळणार असला तरीसुद्धा १४ ऑगस्ट अर्थात रविवारपासून मात्र विदर्भात परत एकदा धुंवाधार पावसाचा अंदाज आहे.
गेल्या पाच दिवसांपासून विदर्भात संततधार सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने नद्या, नाले तुडूंब वाहू लागले आहेत. पुराचा फटका शेतीला तर बसलेला आहेच, मात्र सर्वसामान्यांचेही जनजीवन विस्कळ‌ित झाले आहे. नागपूर जिल्ह्यातही ७४ टक्के अतिरिक्त पर्जन्यमान झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी पुराचा फटका बसला आहे.

मुंबई आणि परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस; आज या ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट

तुलनेने गुरुवारी शहर तसेच विदर्भात पावसाचा जोर काहीसा मंदावलेला होता. शुक्रवारी आणि शनिवारीसुद्धा विदर्भाला कोणत्याही प्रकारचा इशारा नसून विदर्भवासिया बऱ्यापैकी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परंतु, रविवार १४ ऑगस्टपासून मात्र विदर्भाला परत एकदा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या काळात विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची तर इतर जिल्ह्यांमध्येसुद्धा दमदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments