Homeराज्यउद्धव ठाकरेंचे पुतणे निहार ठाकरे शिंदे गटात...

उद्धव ठाकरेंचे पुतणे निहार ठाकरे शिंदे गटात…

न्युज डेस्क – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा झटका दिला आहे. उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार ठाकरे यांनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिल्याचे वृत्त आहे. निहार हे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असून ते सुद्धा शिवसेनेचे उत्तराधिकारी आहेत.

एकनाथ शिंदे यांची बंडखोरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी नवे संकट निर्माण करत आहे. पहिले एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार आपल्या बाजूने घेतले आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतले. आता ठाकरे कुटुंबातच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार ठाकरे यांनी शुक्रवारी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.

शिंदे यांचा राजकारणात येण्याचा प्रस्ताव
एकनाथ शिंदे यांनी निहारसोबतच्या भेटीत राजकारणातही उतरावे, असे म्हटल्याचे वृत्त आहे. त्यावर निहार यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

कोण आहे निहार ठाकरे
निहार ठाकरे यांच्या वडिलांचे नाव बिंदुमाधव ठाकरे होते, त्यांचा 1996 मध्ये रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. बिंदूमाधव हे बाळासाहेब ठाकरेंच्या तीन मुलांपैकी जेष्ठ होते. उध्दव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे इतर दोन आहेत. राजकीयदृष्ट्या निहार ठाकरे यांचे वडील बिंदुमाधव राजकारणात सक्रिय नव्हते. ते चित्रपट निर्माते राहिले आहेत. आता एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची भेट घेऊन त्यांना आपल्या पक्षात घेण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे संकेत मिळत आहेत.

शिंदे सरकारबाबत आदित्य यांचा दावा

एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकनाथ शिंदे सतत धक्के देत आहेत. तर दुसरीकडे उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. एकनाथ शिंदे यांचे सरकार फार काळ टिकणार नसल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी आपल्या निष्ठा यात्रेदरम्यान केला आहे. लवकरच महाराष्ट्रातील जनतेला मध्यावधी निवडणुका पहाव्या लागणार आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments