Friday, April 19, 2024
Homeमनोरंजनउदित नारायण, कुमार सानू, रणवीर शोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार...

उदित नारायण, कुमार सानू, रणवीर शोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान…

Share

मुंबई – दि. 12 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय योगदान पुरस्कार २०२३’ राजभवन येथे प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन धम्मदान ट्रस्ट व ‘परफेक्ट वुमन’ मासिकातर्फे करण्यात आले होते.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी ज्येष्ठ पार्श्वगायक उदित नारायण व कुमार सानू, अभिनेते रणवीर शोरे, पर्यावरण परिषदेचे विजयराजे धमाल, दीपशिखा देशमुख, रिना त्रिवेदी, डॉ खुशी गुरुभाई, कैलास मासूम, सीताराम गायकवाड, मोहम्मद सईद शेख व राखी राजाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे निमंत्रक गुरुभाई सुरेशभाई ठक्कर, वास्तू तज्ज्ञ बसंत रसिवासिया, डॉ.गीत ठक्कर व चंद्रमणी जाधव यावेळी उपस्थित होते.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: