Homeगुन्हेगारीसांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमेश कोलप टोळी तडीपार...

सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमेश कोलप टोळी तडीपार…

सांगली – ज्योती मोरे

सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार उमेश घोलप या टोळीस पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी एक वर्ष कालावधीसाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपारचा आदेश दिला प्रमुख उमेश रमेश कोलप वय 24 आणि ओंकार चंद्रकांत भोरे वय 21, दोघेही राहणार अंकली तालुका मिरज.

या टोळी विरुद्ध सन 2015 ते 2022 दरम्यान बेकायदेशीर कुंटणखाना चालवणे, मुलींची छेड काढणे ,अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणे, दुखापत करून जबरी चोरी करणे, अनाधिकृतपणे घरात शिरून मारहाण करून धमकी देणे ,सरकारी कामात अडथळा आणून सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण करणे अशा तऱ्हेचे गुन्हे नोंद आहेत.त्यामुळे या टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये सांगली ग्रामीण पोलीस निरीक्षक यांनी याबाबत प्रस्ताव सादर केला होता.

त्यानुसार सारा अहवाल आणि बाबी विचारात घेऊन सदर टोळीला व कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पारित केला आहे.सदर कारवाईत पोलीस अधीक्षक दीक्षित दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे ,सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, सहायक पोलीस फौजदार सिद्धाप्पा रुपनर, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील पोलीस ,कॉन्स्टेबल दीपक गट्टे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कपिल साळुंखे, पोलीस नाईक अतुल साळुंखे आदींनी भाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments