HomeCrimeसांगलीत महिला उपजिल्हाधिकाऱ्यांच्यावर अज्ञाताचा चाकूहल्ला...

सांगलीत महिला उपजिल्हाधिकाऱ्यांच्यावर अज्ञाताचा चाकूहल्ला…

सांगली – ज्योती मोरे

सांगलीच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्यावर अज्ञात इसमाने चाकूहल्ला करून त्यांना जखमी केल्याची खळबळजनक घटना सांगलीमध्ये घडली आहे. महिला उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांनी प्रतिहल्ला केल्यानंतर आरोपींनी पळ काढला.

उपजिल्हाधिकारी गेडाम या पहाटे जॉगिंग साठी विश्रामबाग परिसरातील कल्पद्रुम मैदानावर गेल्या असता हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. जॉगिंग करत असताना गाडीवरून आलेल्या दोघांपैकी एका इसमाने गेडाम यांच्या हाताला पकडले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गेडाम यांनी त्याला लाथ मारून खाली पाडले. त्याच वेळी दुसऱ्या आरोपीने गेडाम यांच्या वर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना किरकोळ जखम झाली आहे.

हल्ला होताच मार्शल आर्ट असणाऱ्या गेडाम यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रतिहल्ला केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. काही दिवसापूर्वी या दोघांपैकी एकाने गेडाम यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. तीच व्यक्ती पहाटेच्या सुमारास पुन्हा आली आणि त्याने त्यांच्यावर हल्ला केला आहे. याबाबत उपजिल्हाधिकारी गेडाम यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल केली असून, अधिक तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments