Homeराज्यसौंदलगा येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेत भारतमातेच्या तैलचित्राचे अनावर...

सौंदलगा येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेत भारतमातेच्या तैलचित्राचे अनावर…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

सौंदलगा ता.निपाणी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित साधून मुख्याध्यापक धनंजय ढोबळे यांच्या अर्थसहाय्याने भारत मातेच्या तैलचित्राचे शंकर कदम याच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ग्रा.पं.अध्यक्षा अर्चना कोगनोळे या होत्या.प्रारंभी स्वागत,प्रास्ताविक सुजाता मेस्त्री यांनी केले.तर ध्वजारोहण अजित कांबळे यांनी केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीवीर संगोळीरायण्णा या महापुरषांच्या प्रतिमांचे पुजन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यानी आपले मनोगते व्यक्त केली. या वेळी देशभक्त ,महामानव आदी वेशभुषा साकारणाऱ्या विद्यार्थांनी पालकांचे लक्ष वेधले.

याप्रसंगी विक्रम पाटील,धोंडीराम कांबळे,सुधाकर पाटील, अरुण शिंदे,विनोद माने , वासु भानसे,तब्बसुम मुल्ला,प्रियांका कोळी,सुनिता चव्हाण,सागर पवार,मिथुन कांबळे,संजय पाटील,अमृत चौगुले,दिलीप सांगावे संतोष सुर्यवंशी,महंमद रफिक मोकाशी,शिक्षक/ शिक्षीका, विविधसंस्थांचे पदाधिकारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचलन आणि आभार संतोष पाटील यांनी मानले…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments