सांगली – ज्योती मोरे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १० जून रोजी होणाऱ्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या पासून आठवडाभर संपूर्ण महापालिकाक्षेत्रामध्ये विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात येणार आहे.
१० जून रोजी वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालया मध्ये सकाळी १० वाजून १० मिनिटांनी झेंडावंदन करण्यात येणार असून त्यानंतर कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
यानंतर दि. १० जून ते १६ जून पर्यंत राष्ट्रवादी वर्धापन दिन सप्ताह साजरा करण्यात येईल. ज्यामध्ये समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. शनिवार दिनांक ११ जून रोजी राष्ट्रवादीची सभासद नोंदणी संपूर्ण जिल्ह्यात व महापालिकाक्षेत्रामध्ये अभियान राबविण्यात येत आहे.
रविवार दिनांक १२ जून ते १६ जून च्या काळात आरोग्य शिबीर, वृक्षारोपण,बांधकाम कामगार नोंदणी,पुरोगामी विचारांचा प्रचार व प्रसारासाठी व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत.यासह विविध उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार सर्वत्र साजरे करण्यात येणार आहेत.
तसेच १६ जून नंतर महागाई, बेरोजगारी, केंद्रातील सत्तेत असलेल्या पक्षाच्या नेत्यांकडून महिलांबाबतीत अपमानित करण्यात येणाऱ्या भूमिकेवर आवाज उठविणारे आंदोलने करण्यात येणार आहेत. वरील सर्व उपक्रम पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माहीती घेऊन मोठ्या प्रमाणात साजरे करण्याचे आवाहन शहर-जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज व युवक राष्ट्रवादी शहर-जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.