Homeराज्यगोरेघाट येथे एकलव्य एकल विद्यालयाचे उद्घाटनासह विविध कार्यक्रम संपन्न…

गोरेघाट येथे एकलव्य एकल विद्यालयाचे उद्घाटनासह विविध कार्यक्रम संपन्न…

जिल्हा परिषद सदस्य शांता कुमरे व सरपंच भांडारकर यांची उपस्थिती

रामटेक -: ( तालुका प्रतिनिधी )

तालुक्याच्या आदिवासीबहुल भागातील तथा ग्रामपंचायत बेलदा अंतर्गत येणाऱ्या गोरेघाट येथे एकलव्य एकल विद्यालयाच्या उद्घाटनासह विविध कार्यक्रम काल दि. २९ ऑगस्टला पार पडले.

कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था विदर्भ नागपूर तथा जिल्हा परिषद शाळा गोरेघाट यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद सदस्य शांतताई कुंभरे व बेलदा ग्रामपंचायतचे सरपंच श्री उमेश भांडारकर यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये एकलव्य एकल विद्यालयाचा उद्घाटन समारंभ तसेच वृक्षारोपण कार्यक्रम, आदर सत्कार कार्यक्रम , स्वच्छता अभियान कार्यक्रम, नवीन अंगणवाडीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम व तान्हा पोळा आदी कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडले.

यावेळी उपस्थितांमध्ये जिल्हा परिषद सदस्य शांताताई कुंभरे, बेलदा ग्रामपंचायत सरपंच श्री उमेशभाऊ भांडारकर , उपसरपंच द्रौपदीताई वरखडे , ग्रामपंचायत सदस्यगण तसेच सीआरपीएफ अधिकारी कोडवते सर , श्री सावरकर सर , विखे सर , चांदेकर सर , रणदिवे सर , जितेंद्र भाल , श्री उईके , बचत गट चे सर्व महिला मंडळ , नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मधुकर उईके यांनी तर आभार प्रदर्शन चांदेकर सर यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments