सांगली – ज्योती मोरे
पोलिस अधीक्षक दिक्षीत गेडाम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मनीषा दुबुले यांनी सांगली जिल्ह्यातील अवैध धंदे,गावठी दारु, हातभट्टी दारु ,चोरुन विकणारे देशी दारु विक्री करणारे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.दि.२५ मे २०२२ ते १५ जून २०२२ दरम्यान सांगली जिल्ह्यामध्ये अवैध धंदे,गावठी दारु, हातभट्टी दारु ,चोरुन विकणारे देशी दारु विक्री करणारे यांच्यावर जास्तीत जास्त केसेस करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
अश्याच सांगली जिल्ह्यातील दिघंची येथील हातभट्टी दारु अड्डा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उध्वस्त केला आहे.दिघंची गांवच्या उत्तरेस कुटे वस्तीजवळ गायरानात ओढ्याच्या बाजूस गावठी दारुच्या हातभट्टी आहेत.अशी माहिती मिळाल्याने दोन पंचसक्षम तिथे जाऊन पाहिले.तर तिथे ओढ्याच्या बाजूस झुडपाच्या बाजूला गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन ठेवलेले प्रत्येकी २०० लिटरचे ६ बॅरेल दिसून आले.तब्बल ५७ हजार ५०० रुपयांची दारु रसायन ओढ्यामध्ये ओतून नष्ट केले.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे.