HomeSocial Trendingअनुष्का सोबत विराट कोहलीचा शर्टलेस फोटो झाला व्हायरल...सुरु झाल्यात मजेदार कमेंट्स...

अनुष्का सोबत विराट कोहलीचा शर्टलेस फोटो झाला व्हायरल…सुरु झाल्यात मजेदार कमेंट्स…

न्युज डेस्क – भारतीय संघाने कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर श्रीलंकेचा पराभव करून वनडे मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. यानंतर टीम इंडिया तिरुअनंतपुरममध्ये पोहोचली आहे, तिथून विराट कोहलीने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याच्यासोबत अनुष्का शर्मा दिसत आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार अभिनेत्री पत्नीसोबत नाश्ता करताना दिसत आहे. या व्हायरल फोटोवर त्याच्या चाहत्यांनी अप्रतिम कमेंट्स केल्या आहेत.

फोटोमध्ये कोहली शर्टलेस दिसत आहे, तर अनुष्का पांढऱ्या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. कोहलीच्या हातात दुधाचा पेला आहे, तर समुद्रकिनारी टेबलावर एक मस्त नाश्ता ठेवलेला आहे. तिरुअनंतपुरम समुद्राच्या अगदी जवळ आहे आणि जेव्हाही टीम इंडिया येथे जाते तेव्हा खेळाडू कुटुंब आणि मित्रांसोबत बीचचा आनंद नक्कीच घेतात.

कोहलीच्या एका चाहत्याने फोटोवर कमेंट केली- अरे विराट भैया, आज पतंग नहीं उडायनेगे क्या….दुसर्‍या वापरकर्त्याने कमेंट केली- अच्छे से आनंद कर लो कल शतक मारना है…. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा वनडे रविवार, १५ जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे.

विराट कोहलीने पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावत अनेक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केले होते. तथापि, कोलकातामध्ये त्याच्या बॅटने फारसे काही केले नाही आणि तो फक्त 4 धावांवर बाद झाला, परंतु तिरुअनंतपुरममध्ये कोहली पुन्हा एकदा फलंदाजीने मोठी खेळी करेल अशी अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments