HomeMarathi News TodayMLC Election | विधान परिषदेच्या मतदानाला सुरुवात...दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात...

MLC Election | विधान परिषदेच्या मतदानाला सुरुवात…दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात…

Maharashtra Legislative Council Election अवघ्या राज्यांच लक्ष लागलेलं असलेल्या विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. तर या निवडणुकीसाठी ११ उमेदवार मैदानात असून ‘अकरावा’ म्हणजे पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता आहे. आज सकाळी ९ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी केले पहिले मतदान केले आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेची निवडणूक मोठ्या चुरशीची होणार आहे. तर या निकालाची आतुरता सर्वाना लागली आहे. सकाळी 9 वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार असून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. त्यानंतर मतमोजणी संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास आघाडी सावध झाली आहे. तर भाजपने देखील या निवडणुकीतही चमत्कार करून दाखवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

एकूण आमदार 285, मतांचा कोटा : 26

10 जागांसाठी 11 उमेदवार
इतर : 29 मते = अपक्ष 13, छोटे पक्ष 16

अपात्र : 3 मते = 1 निधन, 2 आमदार तुरुंगात

शिवसेना 55 मते : 7 अपक्षांचा पाठिंबा : 2 जागा, 10 मते जास्त

राष्ट्रवादी 51 मते : 2 जागा, 3 मतांची गरज

काँग्रेस 44 मते : 2 जागा, 8 मतांची गरज

भाजप 106 मते : 5 जागा, 29 मतांची गरज

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments