HomeMarathi News Todayअमरावतीच्या निर्मलधाम बिल्डिंग जवळ झाले वाघोबाचे दर्शन…परिसरात भीतीचे वातावरण…पहा व्हिडीओ

अमरावतीच्या निर्मलधाम बिल्डिंग जवळ झाले वाघोबाचे दर्शन…परिसरात भीतीचे वातावरण…पहा व्हिडीओ

अमरावतीच्या महादेव खोरी ला लागून असलेल्या राजेंद्र नगरच्या निर्मलधाम बिल्डिंग जवळ रहिवाशांना वाघाचे दर्शन झाल्याने दहशतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिकांनी याबाबत वनविभागाला कळविले असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास निर्मलधाम सोसायटीतील काही लोकांना जंगलातील मोरांचा आवाज आल्याने कुतूहलाने डोंगराकडे बघितले असता त्यांना वाघाच्या हालचाली दिसल्याने आरडाओरडा सुरू केली, वाघ हा वयस्कर असल्याने अगदी संथपणे चालत होता, हा डोंगराखाली येईल अशी अनेकांना भीती होती,

स्थानिकांनी भीतीपोटी आपआपल्या घराची दारे खिडक्या बंद करून वाघोबांना बघण्यासाठी घराच्या गच्चीवर सहारा घेतला. वाघ हा आपल्याच भानखेडा दिशेने गेला, तर परिसरातील काही लोकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात त्या वाघाच्या हालचाली कैद केल्यात. दोनदिवस आधीच महादेव खोरीतील स्थानिकांना याच वाघाचे दर्शन झाल्याचे बोलले जात होते.

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा…

मंगलधामच्या पाठीमागे असलेल्या राजेंद्र नगर हा परिसर डोंगराळ असून येथील वातावरण अगदी चिखलदऱ्या सारख असल्याने येथे मोठी वसाहती निर्माण झाल्या आहेत. अनेकांनी डोंगरात तर काही लोकांनी डोंगराच्या कडेला अलिशान घरे बांधली. यापूर्वीही अनेकांना बिबट्या दिसल्याचे बोलल्या जाते, तर मात्र या भीतीला न जुमानता या परिसरात अनेक घरे, बिल्डिंगस मोठ्या प्रमाणात थाटल्या आहेत.

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments