Friday, March 29, 2024
Homeराज्यप्रोत्साहन अनुदानाचा केवळ आदेश; पैशाचा पत्ता नाही नियमित कर्जदारांना ५० हजार रुपयांच्या...

प्रोत्साहन अनुदानाचा केवळ आदेश; पैशाचा पत्ता नाही नियमित कर्जदारांना ५० हजार रुपयांच्या अनुदानाची प्रतीक्षाच…

Share

अकोला – अमोल साबळे

नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता हाच निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने कायम ठेवून २९ जुलै २०२२ रोजी शासनानेही काढला होता मात्र दोन महिने होऊनही शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळाले नसल्याचे चित्र आहे अकोला जिल्ह्यातील शेतकरी प्रोसाणपर अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती या योजनेअंतर्गत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी तर नियमित कर्जत करणाऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाचा निर्णय सरकारने घेतला होता त्यानुसार राज्यभरातील थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला होता दुसरीकडे नियमितपणे कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळाला नव्हता महा विकास आघाडी सरकारने जुलै महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जमा होईल अशी घोषणा केली होती मात्र एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने महा विकास आघाडी सरकार कोसळले त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापना केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचा निर्णय कायम ठेवला होता याविषयी २९ जुलै २०२२ रोजी शासन आजची जाहीर करण्यात आला होता.

प्रतिक्रिया स्पष्ट नाही – प्रोत्साहन अनुदानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीत करावे लागणार किंवा नाही याविषयी शासनाने कुठेही आदेश दिलेले नाहीत त्यामुळे या शेतकऱ्यांना पुन्हा आधार प्रमाणित करायचे आदेश दिल्यास अनुदानाची रक्कम जमा होण्यास आणखी विलंब होणार आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: