कोल्हापूर – राजेद्र ढाले
मागील अनेक महिन्यापासून बंद असलेले कोल्हापूर, मुंबई विमान सेवा सुरू करावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी यांनी विमानतळ संचालक कमल कुमार कटारिया यांना निवेदन दिले विमानसेवा सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला मागील काही महिन्यापासून टू जेट कंपनीच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे विमान सेवेचा बोजवारा उडाला आहे कोल्हापूर मुंबई विमानसेवेसाठी उत्तम प्रतिसाद असून अनेक महिन्यापासून विमानसेवा बंद आहे ही विमानसेवा त्वरित चालू करावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे यावेळी प्रल्हाद गोंधळी संदीप गोंधळी संतोष कांबळे अमर कांबळे कृष्णात रेवडे उपस्थित होते.