Homeराज्य“लाठी खावू गोळी खावू , विदर्भ राज्य मिळवून घेवू” अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...

“लाठी खावू गोळी खावू , विदर्भ राज्य मिळवून घेवू” अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विराआंस चे विधान मंडळावर हल्लाबोल…

विदर्भ राज्य आंदोलन समिती कोअर कमेटीची बैठक आज दि. २३/११/२०२२ रोजी मुख्यालयात घेण्यात आली. २०२३ संपेपर्यंत विदर्भाची मागणी कायम निकाली काढण्याच्या दृष्टीने विदर्भ मिळवू औंदा या मागणीची पूर्तता करण्याकरीता लाठी खाऊ गोळी खावू, विदर्भ राज्य मिळवून घेवू असा निर्धार व्यक्त करण्यात आला. आता आरपारच्या लढाईची सुरवात १९ डिसेंबर रोजी होणार असून तीव्र आंदोलनाचे बिगुल “शुरू हुई है जंग हमारी, लढेंगे जितेंगे” या इर्षेने केली जाणार आहे.

विदर्भातील खासदारांचे (सत्ताधारी व विरोधी) राजीनामे मागण्याच्या १० ही खासदारांकडे केलेला प्रयोग विदर्भातील जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा ठरला असून ही चांगली आशेचे किरण देणारी घटना आहे. या आंदोलनात ११ ही जिल्ह्यातील १२० ही तालुक्यातून १० हजार कार्यकर्ते सहभाग घेणार आहेत व महाराष्ट्रवादी चाले जावो अशी घोषणा विधान मंडळावरील आंदोलनात करणार आहे. यापुढील विधानसभा ही विदर्भाचीच होईल व महाराष्ट्राची असणार नाही व महाराष्ट्र वादी विदर्भातून हद्दपार होतील.

महाराष्ट्र राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे असून शेतकऱ्यांच्या भूअर्जन केलेल्या जमिनीचा मोबदला देण्याकरीता ६५ हजार कोटींचे कर्ज एम.एस.आर.डी.सी. (MSRDC) ला उभे करावे लागत आहे व त्याला थकहमी ही सरकारची आहे आधीच ६ लाख ६० हजार कोटींचे कर्ज थकहमी व लायबिलिटीच्या डोंगराच्या बोझ्याखाली असलेले महाराष्ट्र राज्य कदापीही सक्षम होऊ शकत नाही म्हणून विदर्भातील जनता महाराष्ट्रात १०० वर्षे राहली तरी त्यांच्या अनुशेष भरून निघू शकत नाही.

या सर्व प्रश्नाचे एकच उत्तर ते म्हणजे ‘विदर्भाचे स्वतंत्र राज्य’. या हल्लाबोल आंदोलनाची सुरवात १९ डिसेंबर ला दुपारी १ वाजता यशवंत स्टेडीयम वरून होणार असून पंचशील चौक – झांशी राणी चौक – व्हेरायटी चौक – विधान भवन या मार्गाने आगेकूच करणार आहे. या आंदोलनाला विदर्भ माझा, नाग विदर्भ आंदोलन समिती, जांबुवंतराव धोटे विचार मंच, राष्ट्रीय जनता दल, इत्यादी पक्ष व संघटनांनी जाहीर पाठिंबा आजच्या बैठकीत जाहीर केला.

एड. वामनराव चटप यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले कि, आता लाठी खावू गोळी खावू २०२३ संपायच्या आत विदर्भ राज्य मिळवून घेवू. बैठकीला पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, अध्यक्ष युवा आघाडी विदर्भ प्रदेश मुकेश मासुरकर, नागपूर जिल्हा अध्यक्षा सुधा पावडे, नागपूर विभाग महिला अध्यक्षा रेखा निमजे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सुधा पावडे, कोअर कमेटी सदस्य तात्यासाहेब मत्ते, प्रभाकर कोंडबत्तुनवार, सुनीता येरणे, डॉ. जी. एस. ख्वाजा, अशोक पाटील, प्रकाश लढ्ढा, राजेंद्र आगरकर,

कृष्णाजी भोंगाडे, राजेंद्रसिंह ठाकूर, प्रदीप उबाळे पाटील, डॉ. विजय कुबडे, सुखदेव पात्रे, घीसू पाटील खुणे, नसीर जुम्मन शेख, ग्यानचंद सहारे, अंकुश वाघमारे, गुलाबराव धांडे नागपूर शहर उपाध्यक्ष, नीलिमा सेलूकर, ज्योती खांडेकर, जया चातुरकर, संगीता अंबारे, अनिल केशरवानी, प्यारूभाई उर्फ नौशाद हुसैन, गणेश शर्मा, महासचिव नरेश निमजे, वीणा भोयर, शोभा येवले, मुन्नाजी महाजन, विजय मौदेकर, रामेश्वर मोहबे, धनंजय केळापुरे, प्रेमा पात्रेवार,

श्रीकांत दौलतकर, ललित पवार, श्यामराव वाघाडे, रवींद्र उमाठे, पुंडलिक गोठे, भाईजी ठाकूर विजयसिंह परिहार, हरिराम नासरे, किशोर कुंजेकर, लक्ष्मन देंढवाल, विलास कोदिरवार, बालाजी विखतकर, मिथुन मोहरकर, वीरेंद्र इंगळे, प्रवीण राऊत, अभिजित बोबडे, चंद्रकांत रंभाडे, मैत्र्य राजसिंह ठाकूर, सुरेश हिरनवार सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments