महापंडीत महाज्ञानी ,महाप्रतापी धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज लिखीत, जगत वंदनीय “बुधभूषण” ग्रंथ, हा ग्रंथ जगातील सर्वात माेठ्या पुस्तकाच्या स्वरूपात अजय साहेबराव लेंडे यांनी हस्तलिखित स्वरूपात तयार करून जनतेच्या समाेर आणलेला आहे. सदर ग्रंथामध्ये १६४ पाने असून रुंदी 3 फूट व लांबी ४ फूट आहे आणि वजन १२४ किलो आहे.
हा ग्रंथ आता जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा येथे नेहमीसाठी ठेवण्यात येणार आहे. हा ग्रंथ अमरावती येथून मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे पोहचविण्यासाठी ग्रंथसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली…
सदर ग्रंथ सन्मान यात्रेचे आज दुपारी मुर्तिजापूर येथे आगमन झाले. ग्रंथयात्रेचे दर्यापूर रोडवर पुंडलीक नगर येथे स्वागत करण्यात आले. त्यानंतर भगतसिंग चौक येथे ग्रंथ पूजन करण्यात आले. त्यानंतर शहरांमधून मुख्य रस्त्याने मिरवणूक काढण्यात आली. दुपारी चार वाजता यात्रेचे अकोला साठी प्रस्थान झाले.
यावेळी मुर्तिजापूर येथील विविध सामाजिक संघटना, अनेक राजकीय पक्षचे नेते, कार्यकर्ते पदाधिकारी यांचा सहभाग होता…यामध्ये मराठा सेवा संघाचे- ता.अध्यक्ष गजानन बोर्डे पाटील,
संभाजी ब्रिगेड (विभागीय कार्याध्यक्ष)- संजय भोलाशंकर गुप्ता,भाजपा नेते- कमलाकर गावंडे,वंचित बहुजन आघाडीचे- ता.अध्यक्ष संजय नाईक, मा.न.पा. उपाध्यक्ष सचिन देशमुख
मा. न.पा. उपाध्यक्ष लाला डाबेराव, मा. नगर सेवक- वसुकार, मा.नगर सेवक- आशिष बरे,संदीप जळमकर , राजुभाऊ इंगोले, हर्षल साबळे, किशोर ठाकूर, अमोल पिंपळे,आनंद बांगड, राजू मोहोड, धंदुकीया, राहुल तिडके, श्याम हेंगड, विनोद मुळे, विजय राहटे, शंकर अनभोरे, शैलेश तायडे, मंगेश अंबाडकर, अजय चतुरकर, प्रतिक नागरीकर, कुणाल ठाकरे, पवन तळोकर, प्रा. प्रमोद ठाकरे, निखिल संजय गुप्ता व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.
