Homeराजकीयदेहूतील PM मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारांना भाषणाची संधी का नाही?...सुप्रिया सुळे म्हणाल्या...

देहूतील PM मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारांना भाषणाची संधी का नाही?…सुप्रिया सुळे म्हणाल्या…

संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत पोहोचले असता यावेळी त्यांनी संत तुकाराम मंदिरात संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. यासोबतच संत तुकाराम शिळा मंदिराचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाषणाची संधी न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया अमरावतीत पत्रकार परिषदेत दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. ज्या जिल्ह्यात पंतप्रधान जातात तेथील पालकमंत्र्याला त्यांच्यासोबत राहावे लागते तो या देशाचा प्रोटोकॉल आहे. त्यामुळे अजित दादांचे जागे हे कर्तव्य आहे. पण त्या कार्यक्रमात अजित दादांना बोलू न देणे हे मला अयोग्य वाटले.

या कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण झाले. यामुळे अजित पवार यांना भाषणाची संधी का देण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अजित पवारांचे भाषण न झाल्याने पंतप्रधान मोदीही आश्चर्यचकित झाले. त्यांनी हाताने इशारा करुन याबाबत सूचना केली होती.

या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी न देणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना दिली. “पंतप्रधानांच्या उपस्थितीत देहू येथे कार्यक्रम झाला. या ठिकाणी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांना भाषणासाठी संधी देणे हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments