HomeMarathi News Todayनांदेडमध्ये सिडको भागातील वाईनशॉप व्यवस्थापकाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून...

नांदेडमध्ये सिडको भागातील वाईनशॉप व्यवस्थापकाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून…

महेंद्र गायकवाड
नांदेड

नांदेडच्या सिडको भागात ढवळे कॉर्नर येथे संदीप चिखलीकर यांचे प्रदीप वाईन शॉप असून. या वाईन शॉप मध्ये चिखलीकर यांचे नातेवाईक माधव जीवनराव वाकोरे काटकळंबेकर वय (30) हे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.

वर्दळीचा भाग असलेल्या या वाईन शॉप मध्ये १ सप्टेंबर रोजी रात्री ८ ते साडेआठच्या सुमारास व्यवस्थापक माधव वाकोरे यांचा काही तरुणांसोबत वाद झाला होता. त्यानंतर एक तासाने काही तरुण तेथे आले व त्यांनी माधव वाकोरे यांच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केले यात वाकोरे गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात पोहण्यापूर्वीच त्यांच्या मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत टासले, उपनिरीक्षक अनिल बिच्चेवार आदींनी घटनास्थळी भेट दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments