Homeगुन्हेगारीमहिला सरपंचाच्या पतीला १४ हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले…वाशीम ACBची कारवाई…

महिला सरपंचाच्या पतीला १४ हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले…वाशीम ACBची कारवाई…

वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ग्राम खंडाळा शिंदे या गावातील महिला सरपंचांच्या पतीला १४ हजाराची लाच घेतांना वाशीम लाचलुचपतविरोधी पथकाने रंगेहात पकडले असून महिला सरपंचासह पतीवर गुन्हा दाखल करण्याची मालेगाव पोलिसात प्रक्रिया सुरु आहे.

भास्कर चिन्कू खिल्लारे वय 55 वर्षे, व्यवसाय – मजूरी , (खाजगी इसम सपंच पती) 2) सौ. रंजना भास्कर खिल्लारे वय 50 वर्षे, सरपंच, ग्राम पंचायत खंडाळा शिंदे, असे आरोपीचे नाव असून दोन्ही रा. खंडाळा शिंदे ता.मालेगाव येथील रहिवाशी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय तक्रारदार हे कंत्राटदार असून केलेल्या कामाच्या बिलातील 05 टक्के कमिशन म्हणून आरोपी क्र.01 यानी पडताळणी कारवाई दरम्यान 14,000/- रू. लाचेची मागणी केली व आरोपी क्र.02 यानी त्याला संहमती दर्शविली. सापळा कार्यवाही दरम्यान 14,000/- रु.लाच रक्कम आरोपी क्र.01 यानी त्याचे राहते घरी खंडाळा शिंदे येथे स्विकारली.

दोन्ही आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सक्षम अधिकारी मा. विभागीय आयुक्त अमरावती (आरोपी क्र.02 चे)

मार्गदर्शन –
१) मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस अधीक्षक ,
२) मा.श्री.अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक,
3) मा. श्री देविदास घेवारे,अप्पर पोलीस अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.
4) मा. श्री. गजानन शेळके, पोलीस उप अधीक्षक ला. प्र. वि. वाशिम.

सापळा व तपास अधिकारी
सुजित कांबळे
पोलीस निरिक्षक, ला.प्र.वि. वाशिम.

सापळा कारवाई पथक
सुजित कांबळे
पोलीस निरिक्षक, ला.प्र.वि. वाशिम
पोलीस अंमलदार – पोहवा/नितिन टवलारकर, राहुल व्यवहारे, मपोहवा.योगीता गायकवाड, पोना/रविद्र घरत, योगेश खोटे चालक पोशि/शेख नावेद

सर्व नागरीकांना आवाहन कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, वाशिम पोलीस उप अधीक्षक
@दुरध्वनी क्रं – 07252 235933
@टोल फ्रि क्रं 1064
मोबाईल क्र.9922243438

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments