रामटेक – राजु कापसे
विद्यासागर कला महाविद्यालय खैरी ( बीजेवाडा ) रामटेक येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. सर्वत्र 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. विद्यासागर कला महाविद्यालयात शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच ग्रामपंचायत खैरी, बीजेवाडा यांच्या सयुक्तिक विद्यमाने योग- प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी खैरी बिजेवाडा ग्रामपंचायतिच्या सरपंच श्रीमती उर्मिला खुडसाव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
क्रीडा विभाग प्रमुख प्रा. अनिल दाणी यांनी प्रास्ताविक केले. योग दिवसाचे मनुष्यजीवणातील महत्व समजावून सांगून त्यांनी उपस्थितांना प्रात्यक्षिके करून दाखविली व करवून घेतली. या प्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी डॉ. गिरीश सपाटे, डॉ. ज्योती कवठे, डॉ. रवींद्र पानतावणे, डॉ. सतीश महल्ले, डॉ. आशिष ठाणेकर, संजय डोंगरे, युनूस पठाण, ज्ञानेश्वर हटवार, ललित कनोजे, विनोद परतेती, रफिक कुरेशी तसेच अनेक ग्रामवासी उपस्थित होते.