Homeविविधअकोला । गुटखा (खर्रा) खाल्याने युवकाचा गेला जीव...पातूर तालुक्यातील तुलंगा खुर्द येथील...

अकोला । गुटखा (खर्रा) खाल्याने युवकाचा गेला जीव…पातूर तालुक्यातील तुलंगा खुर्द येथील घटना…

पातुर – निशांत गवई

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तुंलगा खुर्द येथील युवा सचिन अविनाश आठवले वय ३६ यांनी खर्रा (घोटा),खाऊन ठसका लागला,याच ठसक्यामध्ये युवकांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार रोजी सकाळी घडली आहे.

घरून मिळालेल्या माहिती नुसार युवकाने घोटा खाऊन ठसका लागल्याने या युवकाला श्वास घेने कठीण झाले होते.हे पाहून तत्काळ गावतील पोलीस असलेला युवक शुध्दोधन दाभाडे,अरविंद दाभाडे,प्रवीण दाभाडे,सुहास दाभाडे,विनय दाभाडे,आदींनी तत्काळ वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टर त्यांनी मृत घोषित केले.

त्यानंतर बाळापूर येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले.डॉ निदा मॅडम यांना विचारणा केली असता रिपोर्ट तयार झाले नसल्याने काही सांगू शकत नाही अशी माहिती मिळाली .यांच्या मागे पत्नी ,तीन मुली,आई ,एक भाऊ ,एक बहीण असा आप्त परिवार आहे..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments