Homeराजकीयबंडखोर शिंदे गटाचे हाती आकोट-तेल्हारा तालूक्यात भोपळा...निष्ठावान शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या...

बंडखोर शिंदे गटाचे हाती आकोट-तेल्हारा तालूक्यात भोपळा…निष्ठावान शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम…प्रकाश शिरवाडकर

सत्तेच्या लालसे पोटी काही नेते पळाले,त्याना शिवसेनेनेच आमदार, खासदार, मंत्री केले. तेच आज उद्धव ठाकरे यांना बेईमान झाले. मात्र तळागळातील शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असे प्रतिपादन अकोला शिवसेना संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर यांनी केले. ते शिवसेनेच्या अकोट- तेल्हारा तालुका आढावा बैठकीत बोलत होते.

वेताळबाबा संस्थान येथे २४ जुलै रोजी आकोट विधानसभा शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक यांची आढावा बैठक पार पडली. या सभेत शिवसैनिकाना मार्गदर्शन करण्यात आले.
शिवसैनिकांनी खचून न जाता जोमाने कामाला लागावे. पक्ष कार्य तळागाळात पोहोचावे. येणारा काळ आपलाच आहे.आजही जनता, प्रामाणिक शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्याच सोबत आहेत असे मार्गदर्शन जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी केले. ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली, त्यांची जागा जनता त्यांना दाखवणारच असे जिल्हा संघटिका मायाताई म्हैसने आपल्या भाषणात म्हणाल्या. बैठकीचे प्रास्ताविक उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी केले.

आकोट विधानसभा मतदारसंघात एकही शिवसैनिक गद्दारी करणार नाही. आजच्या मेळाव्यातुन शिवसैनिकांना उर्जा मिळाली. शिवसेनेची पाने मुळे किती खोल आहेत हे आगामी निवडणुकांत दाखवुन देऊ अशी ग्वाही उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांच्या वतीने दिली. तसेच याप्रसंगी शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपसरपंच जावाउद्दीन, इमायत हुसेन, अब्दुल मजिद, रहीम खान पठाण यांच्या सह मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. नवनियुक्त जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांचा आकोट विधानसभेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, तालुका प्रमुख श्याम गावंडे, युवासेना उपजिल्हा संघटक राहुल कराळे, माजी पं.स. सदस्य साहेबराव भगत, शहर प्रमुख सुनील रंधे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत अढाऊ, जिल्हा परिषद सदस्य जगन निचळ, जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ, प्रा.अतुल म्हैसने, जिल्हा परिषद सदस्य राजू मोरे, मोहन गावंडे, सुभाष सुरतने, गोपाल विखे, अजय गावंडे, ज्ञानेश्वर ढोले, निलेश धनभर, राजेश वानखडे, राहुल पाचडे, गोपाल म्हैसने, पुरुषोत्तम गावंडे यांच्या हस्ते जिल्हाप्रमुख यांचा सत्कार करण्यात आला.

बैठकीला उपजिल्हा संघटीका उषाताई गिरनाळे, तेल्हारा तालुका संघटीका वनिताताई वाकोडे, शहर संघटक कमल वर्मा, अश्विनीताई हरणे, हेमलताताई सपकाळ, संतोष जगताप, सरपंच धीरज गीते, संजय गयधर, अमोल बदरखे, पं.स. माजी सभापती दिपक इंगळे, अक्षय वाघोडे, विलास ठाकरे, ज्ञानेश्वर बोरोकार, पं.स. सदस्य राधेश्याम जामुनकर, पं.स. सदस्य मुरली खोटे, पं स. सदस्य सुरज गणभोज, दिनेश बोचे, गोपाल कावरे, प्रथमेश बोराडे, सोपान साबळे, धिरज गावंडे, जयपाल ठाकूर, नंदू कुलट, नंदू बोंद्रे,सागर गिते,गणेश चंडालिया, प्रशांत येऊल, प्रशांत रणगिरे, उमेश आवारे, उत्तम महल्ले, रवि मिसळकार, किशोर तिवारी, भगवान अस्वार, सतिश बोचे, विलास शेंडे, नंदू सपकाळ, गजानन सोळंके, प्रमोद नगदे, महेश खोटरे, अक्षय साबळे, भास्कर जाधव, बाळु सावरकर, बंडू जाधव,हर्षल अस्वार, श्रीकांत कांबे, सुरेश शेंडोकारआदींसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते. बैठकीचे संचालन तालुका प्रमुख श्याम गावंडे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments