Saturday, April 27, 2024
HomeMarathi News Todayशेतकऱ्यांना ५० हजारांची मोठी गुडन्यूज...शिंदे-फडणवीस सरकारच्या कॅबिनेट बैठकीत निर्णय...

शेतकऱ्यांना ५० हजारांची मोठी गुडन्यूज…शिंदे-फडणवीस सरकारच्या कॅबिनेट बैठकीत निर्णय…

Share

अमोल साबळे
राज्यातील शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या शासन निर्णयाचा लाभ सुमारे १५ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे तसेच यासाठी ६ हजार कोटींचा निधी लागेल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे १३.८५ लाख शेतकऱ्यांच्या १४.५७ लाख कर्जखात्यांसाठी अंदाजे ५७२२ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.

ही योजनाा लागू करण्याची मागणी राज्यातील शेतकऱ्यांनी केली होती. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसं आश्वासनही दिलं होतं. मात्र दुर्दैवाने शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आहे.

या योजनेचा लाभ २०१९ मध्ये राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना सुध्दा घेता येईल. एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्ज परतफेड केली असल्यास त्या वारसाला सुद्धा हा लाभ मिळेल.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० हा कालावधी विचारात घेऊन या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली.

२०१७-१८ या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज ३० जून, २०१८ पर्यंत पुर्णत: परतफेड केले असल्यास, २०१८-१९ या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज ३० जून, २०१९ पर्यंत पुर्णत: परतफेड केले असल्यास, २०१९-२० या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज ३१ ऑगस्ट, २०२० पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास अथवा २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनूसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पुर्णत: परतफेड (मुद्दल+व्याज) केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी २०१८-१९ अथवा २०१९-२० या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आली.

मात्र, २०१८-१९ अथवा २०१९-२० या वर्षात घेतलेल्या व त्याची पुर्णत: परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम ५० हजारापेक्षा कमी असल्यास, अशा शेतकऱ्यांना त्यांनी २०१८-१९ अथवा २०१९-२० या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रक्कमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

प्रोत्साहनपर लाभ देतांना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन ५० हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल. प्रोत्साहनपर लाभ योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: