Saturday, April 27, 2024
Homeकृषीअतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 717.88 कोटी नांदेड जिल्ह्यासाठी प्राप्त...नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया...

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 717.88 कोटी नांदेड जिल्ह्यासाठी प्राप्त…नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया वेगात्…

Share

महेंद्र गायकवाड
नांदेड

जुलै महिन्यात नांदेड जिल्ह्यात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली. सुमारे 7 लाख 41 हजार 946 शेतकऱ्याचे 5 लाख 27 हजार 491 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने नांदेड जिल्ह्यासाठी 717 कोटी 88 लक्ष रुपयांचा निधी वितरीत केला आहे. सदर प्राप्त निधी नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रीया वेगात सुरु असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.
 
ज्या शेतकऱ्यांचे 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांसाठी सदर निधी प्राप्त झाला आहे. सदर निधीचे वाटप तालुकास्तरावर झालेले आहे. संबंधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर बँकेमार्फत ही नुकसान भरपाई रक्कम जमा करण्याची प्रक्रीया सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तथापि नांदेड जिल्ह्याला यापूर्वीच 8 सप्टेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार इतराच्या अगोदर निधी मिळाला हे विशेष.
 
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलया शेतकऱ्यांसाठी तालुकानिहाय प्राप्त निधीची तरतूदे पुढीलप्रमाणे आहे. नांदेड- 25 कोटी 89 लक्ष, अर्धापूर -29 कोटी 16 लक्ष, कंधार -55 कोटी 12 लक्ष, लोहा 61 कोटी 5 लक्ष, देगलूर 42 कोटी 95 लक्ष, मुखेड 54 कोटी 70 लक्ष, बिलोली- 40 कोटी 35 लक्ष, नायगाव- 45 कोटी 5 लक्ष, धर्माबाद- 29 कोटी 53 लक्ष, उमरी- 40 कोटी 11 लक्ष, भोकर- 52 कोटी 43 लक्ष, मुदखेड- 24 कोटी 27 लक्ष, हदगाव-85 कोटी 20 लक्ष, हिमायतनगर- 42 कोटी 74 लक्ष, किनवट-67 कोटी 9 लक्ष, माहूर- 22 कोटी 20 लक्ष असे एकूण जिल्ह्यास 717 कोटी 88 लाख रुपये निधी प्राप्त झाला असून वाटप सुरु आहे असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: