Homeगुन्हेगारीहद्दपारीचा आदेश मोडून सांगली शहरात फिरणाऱ्या एकास अटक...

हद्दपारीचा आदेश मोडून सांगली शहरात फिरणाऱ्या एकास अटक…

सांगली – ज्योती मोरे

पोलिसांना सांगली विभागात विविध गुन्ह्यात हवे असलेले आरोपी शोधत असताना सदर पथकातील सुनील जाधव यांना खबऱ्यामार्फत आकाश जाधव राहणार गारपीट दर्ग्याजवळ सांगली हा सहा महिन्यांसाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला तरुण सांगलीतील आरटीओ ऑफिस शेजारील एसटी स्टँड बस स्टॉप जवळ थांबला असल्याची माहिती मिळाली. नुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार व पोलीस स्थापने सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून त्याच ताब्यात घेतले आहे.

त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव आकाश उर्फ अक्षय विष्णू जाधव वय 24 वर्षे राहणार गारपीर दर्ग्याजवळ गणेश नगर सांगली असे सांगितले. त्यास सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असतानाही,विनापरवाना जिल्ह्यात मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन संजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीस संजय नगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

पुढील तपास संजय नगर पोलीस ठाणे करत आहे.सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम ,अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे, पोलीस अंमलदार निलेश कदम, दीपक गायकवाड, ऋतुराज होळकर, सुनील जाधव, दीपक गट्टे, आकाश गायकवाड आदींनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments