Homeराजकीयआम आदमी पार्टी नरखेड व महिला बचत गट संयुक्तपणे वाढत्या महागाई विरोधात...

आम आदमी पार्टी नरखेड व महिला बचत गट संयुक्तपणे वाढत्या महागाई विरोधात जन आक्रोश रैली…

नरखेड – अतुल दंढारे

आज दिनांक 15/9/2022 रोज गुरुवारला आम आदमी पार्टी नरखेड व महिला बचत गट यांच्या संयुक्तपणे श्री गणेश रेवतकर नागपूर जिल्हा संयोजक यांच्या नेतृत्वात वाढत्या महागाईविरोधात जन आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले. आज वाढत्या महागाईवर नरखेड शहर संयोजक लीलाधर कळंबे यांनी प्रकाश टाकला व वाढता भ्रष्टाचार यावर श्री विनोदजी क्षीरसागर यांनी आपले विचार मांडले.

जर दिल्लीमधील मोफत दिल्या जाऊ शकते तर नरखेड मध्ये का मिळू शकत नाही. यावर आपले विचार व्यक्त केले. नरखेड मध्ये सरकारी शिक्षण व्यवस्था ही किती खालावलेली आहे त्याबद्दल शंकर म्हेत्रे यांनी आपला रोष व्यक्त केला. आटा चक्की चे वाढलेले दर कमी करण्यासाठी ममताताई गोरखेड़े महिला बचत गट प्रमुख यांनी महिलांची मागणी व्यक्त केली.आम आदमी पार्टी कार्यालय नरखेड येथून सौ. संध्याताई गजबे यांनी प्रस्तावना करून रॅली ला सुरुवात केली.

तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जनार्दन कडवे यांच्याद्वारे माल्यार्पण करून केली रॅली बाजार चौक नरखेड. येथून समोर जाऊन स्वामी विवेकानंद चौक येथे तरुण बालपांडे यांच्या द्वारे स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे माल्यार्पण केले तथा संगीताताई ढवळे शत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला माल्यार्पण करून तहसील कार्यालय नरखेड येथे तहसीलदार नरखेड यांना खालील विषय बद्दल निवेदन देण्यात आले.

गैस सिलेंडर दर वाढ, इतर राज्यापेक्षा वीज दर वाढ, नरखेड मधील खालवलेली शिक्षण व्यवस्था व निम्न दर्जाची स्वास्थ्य सुविधा यावर श्री मुख्यमंत्री साहेब यांनी त्वरीत विचार करून जनहिताचे निर्णय घ्यावे व आमच्या मागण्या पूर्ण कराव्या हिच अपेक्षा. आमच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. असा इशारा आम आदमी पार्टी नरखेड च्या वतीने देण्यात आला.

राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.या मोर्चामध्ये प्रमुख्याने रवींद्र काटे, बुद्धा मुलताईकर, प्रकाश नारनवरे, जगत जीवन कोरडे संजय गजभिये, घनश्याम गायधने, रवीना उईके, हीना नासरे, संगीता नेहरे, सागर बडोदेकर, महेश नरवरे, धनराज बेलकडे, मीडिया प्रमुख सुनील बरोले, सुनिता हुंगे, ललिता शिव हरे, मीना लाडेकर, अर्चना कळंबे, पुष्पाताई ढोके, लक्ष्मीबाई बाराई, कमला कोरडे, सुनिता उईके प्रतिभा ढोबळे, शिल्पा राऊत, सुनिता बागडे, कोमल कजबे, माया नगराळे, शकुन सातपुते, शितल काळमेघ, दुर्गा पगारे. आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments