Friday, April 26, 2024
Homeगुन्हेगारीआकोट पोलिसांनी दिले तीन गोवंश यांना जीवदान...कत्तलीस नेणारे पोचले कारागृहात...

आकोट पोलिसांनी दिले तीन गोवंश यांना जीवदान…कत्तलीस नेणारे पोचले कारागृहात…

Share

आकोट शहर पोलीस ठाणे पोलिसांनी कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या तीन गोवंशांना कत्तल करणाऱ्यांच्या हातून वाचविले आहे. या कत्तल करणाऱ्यांना आकोट न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

गुन्हयाची हकीकत अशा प्रकारे आहे की, पो.स्टे.आकोट शहर, येथे फिर्यादी पोहेकॉ सुलतान खाँ बिस्मीला खॉ पठाण यांनी लेखी फिर्यादी दिली की, पो.स्टे. आकोट शहर येथे गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, अंजनगांव रोडने आकोट कडे गाडी क्र एम एच २७ बिएक्स ४६३१ मध्ये गोवंश जातीचे जनावरे संशयास्पद स्थितीत बांधलेले असुन ती गाडी आकोट कडे येत आहे. अशी माहीती मिळाल्याने पोलिसांनी आकोट अंजनगांव मार्गावरील उमेश दाभाडे यांचे शेताजवळ जावुन नाकाबंदी केली. ०९/३० वा चे दरम्यान अंजनगाव मार्गाने आकोट कडे वर नमुद क्रमाकाची गाडी येतांना दिसली.

सदर गाडीस थांबवुन गाडी चालकास त्याचे नांव विचारले असता त्याने त्याचे नांव शेख कयुम शेख हारून वय २४ वर्ष रा. अंजनगाव सुर्जी जि.अमरावती असे सांगितले. सदर गाडीची पंचासमक्ष पाहणी केली असता, गाडीमध्ये ०३ गोवंश जातीची जनावरे एकमेकांना क्रूरतेने जखडुन सुती दोराने बांधलेले स्थितीत दिसुन आली. वाहन चालकास सदर जनांवरांचे मालकी हक्का बाबत विचारपूस केली असता, सदरची जनावरे ही शेख इस्माईल शेख हारून वय २८ वर्ष रा. गौसीया नगर आकोट यांची असल्याचे सांगितले. ही ०३ गोवंश जातीची जनावरे कत्तलीकरीता आणलेले असल्याची खात्री झाल्यावर ही ०३ जनावरे अंदाजे किंमत ४८,०००/- रूपये व टाटा इन्टा गाडी क्र एम एच २७ बिएक्स ४६३१ कि अं ४०००००/- असा एकुण ४,४८,०००/- चा मुददेमाल पंचासमक्ष जप्त करण्यात येऊन आरोपी १) शेख हारून वय २८ वर्ष रा. गौसीया नगर आकोट व चालक २)शेख कयुम शेख हारून वय २४ वर्ष रा अंजनगाव सुर्जी जि. अमरावती यांचे विरुध्द कलम ५,५ (अ), ५ (ब), ९, ११, प्राणी संरक्षण अधिनियम १९७६, प्राण्यांना कृरतेने वागवण्यास प्रतीबंध अधिनियम १९६० कलम ११ (च), (ज) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कार्यवाही उपविभागिय पोलिस अधिकारी रितु खोकर, पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांचे मार्गदर्शना खाली पोउपनि चंद्रकांत ठोबरे, पो. हवा. राजेश वसे, सुलतान पठाण, नापोकॉ विजय सोळंके, पोकॉ कपिल राठोड, पोकॉ प्रेमानंद पचांग पोका विशाल हिवरे यांनी केली.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: