Homeग्रामीणपोपटखेड प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये जाणाऱ्या रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?...

पोपटखेड प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये जाणाऱ्या रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?…

अकोट – ग्राम पोपटखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण 33 गावे आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये आदिवासी बहुल भागातील रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात. गर्भवती महिला व वयोवृद्ध रुग्ण सुद्धा या केंद्रात मोठ्या प्रमाणात येत असतात. या सर्व रुग्णाच्या सेवेसाठी पी.एच.सी. अंतर्गत ऍम्ब्युलन्स ची सोय केली आहे.

पण शहानूर रोड वरून पी.एच.सी. पर्यंत जाणारा रस्ता हा पावसामुळे पूर्ण उखडला आहे. रोडवर दोन तीन ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यात पाणीही साचल आहे. काही रुग्ण ऑटो व मोटरसायकल ने ये जा करतात. तेव्हा या रुग्णांना रस्त्यात च उतरून पायी जाव लागत आहे.

या खड्ड्यामध्ये मुरूम टाकून रस्ता निटनेटका करावा. आणि रुग्णांना दिलासा द्यावा अशी या पंचक्रोशीतील लोकांची मागणी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments