Friday, April 26, 2024
Homeराज्यआकोट उपविभागीय अधिकारी यांनी दिला पीडितांना दिलासा...

आकोट उपविभागीय अधिकारी यांनी दिला पीडितांना दिलासा…

Share

संजय आठवले, आकोट

आकोट शहरातील संजय निराधार तथा श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांनी दिनांक १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी खकोट उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर मांडलेली समस्या ऐकल्यानंतर लगेच दुसरी दिवशी उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पीडितांची समस्या सोडविल्याने पीडितांनी आनंद व्यक्त केला आहे.

आकोट शहरातील सर्वच बँकांमधून शासनाच्या विविध योजनांचे अनुदान लाभार्थ्यांना वितरित करण्यात येते. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा आकोट द्वारे ही संजय निराधार व श्रावणबाळ योजना लाभार्थींना अनुदान वितरित केले जात होते. परंतु गत पाच सहा महिन्यांपासून या बँकेने या लाभार्थ्यांना अनुदान वितरित करणे बंद केल्याने असंख्य लाभार्थी अनुदानापासून वंचित झाले होते. हे अनुदान वितरित करण्यासाठी तहसीलदार यांनी आपले बँकेत स्वतंत्र खाते उघडावे आणि त्यात लाभार्थींच्या अनुदानाची रक्कम जमा करावी त्यातून बँक हे वितरण केले जाईल अशी अट बँकेने ठेवली होती. त्याने पीडित झालेल्या लाभार्थींनी स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्ट दिनी उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची भेट घेऊन त्यांना आपली समस्या सांगितली. त्याची त्वरित दखल घेऊन उपविभागीय अधिकारी यांनी ह्या पीडितांना लगेच येणाऱ्या कार्यालयीन कामकाजाचे दिवशी समस्या सोडविण्याचे वचन दिले.त्यानुसार त्यांनी आपला दिलेला शब्द पूर्ण करून या पीडीताना दिलासा दिला आहे. त्याने पीडितांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्रीकांत देशपांडे यांना मिळाली अपर जिल्हाधिकारी म्हणून बढती, त्यांचे जागी कोण येणार? आकोटकरांना उत्सुकता.

आकोटचे विद्यमान उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची बढती झाली असून अपर जिल्हाधिकारी म्हणून ते आता बदलीवर जाणार आहेत. अकोला येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कारकीर्द पूर्ण झाल्यावर त्यांची यवतमाळ येथे बदली झाली होती. त्यानंतर १० ऑक्टोबर २०२० रोजी त्यांनी आकोट उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला. आकोट उपविभागात त्यांचे कारकीर्दीस ऊणे पुरे दोन वर्षेही होत नाहीत तोच त्यांना अपर जिल्हाधिकारी म्हणून बढती मिळाली आहे. शासनाचे नियमानुसार अल्पावधीतच ते भरतीच्या ठिकाणी कूच करतील. त्यांची बदलीवर जाण्याची खबर पसरताच आता त्यांचे जागी कोण येणार? याबाबत आकोट करांमध्ये उत्सुकतेचे वातावरण पसरले आहे. या दरम्यान आकोट तालुक्यातील सर्वच स्तरातील मान्यवरांनी उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना भेटून शुभेच्छा दिल्या.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: